सिक्स ठोकल्यानंतर पाकिस्तानचा बॉलर संतापला आणि फलंदाजाचे डोकंच फोडलं, व्हिडीओ

सिक्सचा पाकिस्तानी बॉलरनं घेतला बदला... डोक्यात घातला बॉल, पाहा व्हिडीओ

Updated: Jun 12, 2021, 02:59 PM IST
सिक्स ठोकल्यानंतर पाकिस्तानचा बॉलर संतापला आणि फलंदाजाचे डोकंच फोडलं, व्हिडीओ

मुंबई: दोन बॉलवर सलग सिक्स ठोकल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाला राग आला. संताप अनावर झाल्यामुळे त्याने घातक बॉल टाकला आणि तो फलंदाजाच्या डोक्याला लागला. त्यामुळे फलंदाजाला मैदानात स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची वे   ळ आली आहे. हा संपूर्ण प्रकार पाकिस्तान सुपर लीग दरम्यान घडला.

वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज आंद्रे सरेल पाकिस्तानी सुपर लीग सामन्या दरम्यान जखमी झाला. क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळत असताना इस्लामाबाद यूनाइटेड संघातील पाकिस्तानी गोलंदाजाने बॉल टाकला. पहिल्या दोन बॉलवर आंद्रेनं सिक्स ठोकला. याचा राग गोलंदाजाला आला आणि त्याने बदला घ्यायचं ठरवलं. नसीम शाहाने घातक गोलंदाजी केली आणि आंद्रे रसेलच्या डोक्याला बॉल लागून तो जखमी झाला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आंद्रे सरेलला 14 व्या ओव्हरमध्ये दुखापत झाली. 13 धावा करून आंद्रे रसेल आऊट झाला. दुखापत झाल्यानंतरही आंद्रेनं हार न मानता मैदान सोडलं नाही. नंतरच्या बॉलमध्ये रसेल कॅच आऊट झाला. आंद्रे रसेल ऐवजी आता दुसऱ्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्याच्या जागी पुढच्या डावासाठी बॉलरची रिप्लेसमेंट करण्यात आली.