विराट की अनुष्का कोणासारखी दिसते वामिका? कोहलीची बहीण म्हणते...

विराटची बहीण भावनाला चाहत्यांनी वामिका कोणासारखी दिसते असा प्रश्न विचारला त्यावर ती काय म्हणाली वाचा सविस्तर

Updated: Jun 12, 2021, 12:30 PM IST
विराट की अनुष्का कोणासारखी दिसते वामिका? कोहलीची बहीण म्हणते...

मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत अनुष्का आणि त्याची मुलगी वामिका देखील साउथेप्टमला आहेत. विमानतळावर इंग्लंडला जाताना वामिका आणि अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वामिकाला विराट आणि अनुष्काने सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं आहे. वामिकाचा फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. मात्र कोहली आणि अनुष्काने अद्याप वामिकाला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला नाही. 

वामिकाचा जन्म 11 जानेवारी रोजी झाला होता. आता वामिका जवळपास 5 महिन्यांची झाली आहे. विराट कोहलीची बहीण भावनाने सोशल मीडियावर चाहत्यांना उत्तरं देत असताना तिला एकाने प्रश्न विचारला की तू वामिकाला पाहिलंस का ती विराट की अनुष्का कोणासारखी दिसते? त्यावर उत्तर देताना भावना कोहली म्हणाली की मी वामिकाला पाहिलं. ती परीसारखी दिसते. यासोबत भावनाने प्रेमाचे इमोजी अपलोड केले आहेत. 

अनुष्का शर्मा आणि वामिका सध्या विराटसोबत आहे. विराट कोहली सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळवली जाणार आहे. 

आयसीसीने टीम इंडियाच्या खेळाडूंना गर्लफ्रेंड किंवा पत्नीला इंग्लंड दौऱ्यावर घेऊन जाण्याची परवानगी दिल्यामुळे विराट अनुष्का आणि वामिकासोबत इंग्लंडमध्ये आहे. सध्या टीम इंडियाचे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी सराव करत आहेत.