Arjun Tendulkar ला फलंदाजांनी धु-धु धुतला; Ranji Trophy मध्ये सचिनच्या लेकाचा फ्लॉप शो सुरुच!

छत्तीसगडविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची गोलंजादी आणि फलंदाजी या दोघांमध्येही खराब कामगिरी पहायला मिळाली. दोन्हींमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना निराश केलं आहे. 

Updated: Jan 27, 2023, 07:03 PM IST
Arjun Tendulkar ला फलंदाजांनी धु-धु धुतला; Ranji Trophy मध्ये सचिनच्या लेकाचा फ्लॉप शो सुरुच! title=

Arjun Tendulkar bad Performance : रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इलाइट ग्रुप-सीमध्ये गोवा विरूद्ध छत्तीसगड (Chhattisgarh vs Goa) असा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये छत्तीसगढचा 8 विकेट्सने विजय (Chhattisgarh wi by 8 wickts) झाला आहे. यावेळी अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) टीम गोव्याला फॉलोऑनचा सामना करावा लागला, मात्र तरीही त्यांना पराभव टाळता आला नाही. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरकडून चांगल्या खेळाची अपेक्षा करण्यात आली होती, मात्र सध्या त्याचा फ्लॉप शो सुरु असल्याने टीमला त्याची काहीच मदत होऊ शकली नाही. 

छत्तीसगडविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची गोलंजादी आणि फलंदाजी या दोघांमध्येही खराब कामगिरी पहायला मिळाली. दोन्हींमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना निराश केलं आहे. 

छत्तीसगडविरूद्ध Arjun Tendulkar चं खराब प्रदर्शन

भारतीय टीमचा माजी खेळाडू आणि क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याच्या टीमकडून खेळतोय. मात्र नुकत्याच झालेल्या छत्तीसगडविरूद्धच्या सामन्यात अर्जुनला काहीही कमाल दाखवता आली नाहीये. मुख्य म्हणजे पदार्पणाचा सामना सोडला तर अर्जुनने इतर कोणत्याही सामन्याच चांगली कामगिरी केलेली नाही. 

छत्तीसगडविरूद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने दोन्ही डावांमध्ये निराश केलं. पहिल्या डावामद्ये त्याने 32 रन्स तर दुसऱ्या डावामध्ये तो अवघ्या 13 रन्सवर माघारी परतला. इतकंच नाही तर गोलंदाजीमध्येही त्याचा फ्लॉप शो सुरुच आहे. त्याला या सामन्यात एकंही विकेट काढता आली नाही. 

असा रंगला गोवा विरूद्ध छत्तीसगडविरूद्धचा सामना

या सामन्यामध्ये छत्तीसगडचा कर्णधार हरप्रीत सिंह ने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान हा निर्णय त्यांच्यासाठी फारच फायदेशीर ठरलेला दिसला. पहिल्यांदा फलंदाजी करताना छत्तीसगडकडून शशांक चद्रराकरने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर 531 रन्सचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याच्या टीमचे चांगलेच धाबे दणाणले. 

गोव्याची संपूर्ण टीम 359 रन्सवर ऑल आऊट झाली आणि छत्तीसगडच्या टीमने त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही गोव्याच्या गोलंदाजांना काही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावामध्येही गोव्याची टीम 223 रन्सवर माघारी परतली. यानंतर अवघे 52 रन्स करून छत्तीसगड टीमचा विजय झाला.

डेब्यू सामन्यात अर्जुनने केलं होतं शतक

गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.