Arjun Tendulkar : आयपीएल 2023 पासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) चांगलाच चर्चेत आला आहे. 3 वर्षांच्या कालावधीनंतर अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) आयपीएलमध्ये डेब्यू केला. यावेळी अर्जुनची कामगिरी फारशी चांगली दिसून आली नाही. मात्र सध्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी सुरु असून यामध्ये अर्जुनने त्याच्या गोलंदाजीने फलंदाजांच्या नाकीनऊ आणलंय.
भारतात खेळल्या जाणार्या देशांतर्गत टी-20 टूर्नामेंट सय्यद मुश्ताक ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रांचीमध्ये गोवा आणि आंध्र यांच्यात सामना झाला रंगला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गोव्याने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 232 रन्स केले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात आंध्रनेही चांगली सुरुवात केली. परंतु अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) या सामन्यात आपल्या गोलदांजीने खळबळ उडवून दिली. अर्जुनने त्याच्या गोलंदाजीच्या जीवावर या स्पर्धेत गोव्याला पहिला विजय मिळवून दिला.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. सय्यद मुश्ताक ट्रॉफी स्पर्धेत गोव्याकडून पहिला सामना खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) आंध्र प्रदेशच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात अर्जुनने आंध्रचा स्टार फलंदाज रिकी भुईसह पृथ्वी राज यारा आणि ललित मोहन यांची विकेट घेतली.
या सामन्यात अर्जुनने ( Arjun Tendulkar ) केवळ 3.3 ओव्हर टाकल्या. यावेळी 46 रन्स खर्च करत अर्जुनने 3 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 13.14 होता. अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात मुंबईतून केली होती. मात्र यावेळी त्याला मुंबई टीमकडून पुरेशी संधी मिळाली नाही. अखेरीस 2022-23 च्या देशांतर्गत क्रिकेट सिझन सुरू होण्यापूर्वी त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) आयपीएल 2023 मध्ये डेब्यू केलं होतं. तब्बल 3 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेतनंतर अर्जुन आयपीएलमध्ये खेळला. अर्जुनने आयपीएलमध्ये 4 सामने खेळले असून 3 विकेट्स काढण्यात त्याला यश आलंय. त्याने 9.5 ओव्हर्सची गोलंदाजी केली असून 92 रन्स खर्च केलेत. याशिवाय अर्जुनने फलंदाजी केली असून, 9 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी केली आहे.