Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar ) मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएलनंतर अर्जुनच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागलीये. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) डेब्यू केलं. दरम्यान यानंतर त्याचा देवधर ट्रॉफीमध्ये समावेश करण्यात आला. अर्जुन देवधर ट्रॉफी ( Deodhar Trophy ) मध्ये साऊथ झोनकडून खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने दाणादाण उडवून दिली.
नुकतंच मंगळवारी सेंट्रल झोनविरूद्ध अर्जुनने उत्तम गोलंदाजी केली. या सामन्यानंतर अर्जुनच्या कामगिरीची सोशल मीडियावर चर्चा होतेय.
अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) ने सेंट्रल झोनविरुद्ध साऊथ झोनकडून गोलंदाजीला सुरुवात केली. दरम्यान या सामन्यामध्ये सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्याला यश मिळालं नाही. मात्र याच सामन्यात त्याने कमबॅक केलं. यावेळी त्याने सेंट्रल झोनकडून सर्वाधिक रन्स करणारा यश दुबेची विकेट काढली. यश ७७ रन्स करून पव्हेलियनमध्ये पाठवलं. याशिवाय शिवम मावीला देखील त्याने माघारी धाडलं
अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) ने या सामन्यामध्ये 10 ओव्हर्स फेकले. यावेळी त्याने 65 रन्समध्ये 2 विकेट्स घेतले. यावेळी अर्जुनची एकोनॉमी 6.50 होती. दरम्यान यानंतर पुन्हा एकदा अर्जुनच्या नावाची चर्चा होत असून त्याला टीम इंडियामध्ये एन्ट्री देण्याची मागणी करण्यात येतेय.
South Zone bowlers on
Arjun Tendulkar gets the well-set Yash Dubey O.U.T
Central Zone reach 192/7 with less than 7 overs to go!
Live Stream - https://t.co/M03oZDsf3j
Follow the match - https://t.co/2PNA0GOiLC#DeodharTrophy | #CZvSZ pic.twitter.com/A89p9LXvA0
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 1, 2023
यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुनने मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) कडून डेब्यू केलं. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात त्याने पहिली मॅच खेळली. यावेळी त्याला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये त्याने 3 विकेट्स काढले. तसंच एकदा फलंदाजी करताना त्याने 9 बॉल्समध्ये 13 रन्स केले.
23 वर्षीय गोलंदाजी अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) गोव्याकडून रणजी ट्रॉफी खेळतो. यावेळी आता त्याने आतापर्यंत 7 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या आहे. इतकंच नाही तर तर त्याने फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी करत पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. शतकाच्या मदतीने 223 रन्स केलेत.