Hardik Pandya : हार्दिकने ट्रॉफीला हातंही लावू दिला नाही? संजूला दिलेल्या वागणुकीनंतर व्हिडीओ व्हायरल

Hardik Pandya : तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नसल्याने कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे होती. यावेळी सिरीज जिंकल्यानंतर ट्रॉफीसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( Social Media Viral Video ) होताना दिसतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 2, 2023, 11:58 AM IST
Hardik Pandya : हार्दिकने ट्रॉफीला हातंही लावू दिला नाही? संजूला दिलेल्या वागणुकीनंतर व्हिडीओ व्हायरल  title=

Hardik Pandya : वेस्ट इंडिजविरूद्धच्या ( India vs West Indies ) वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवत सिरीजही आपल्या नावे केली आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नसल्याने कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे होती. दुसऱ्या सामन्यात झालेल्या दारूण पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) उत्तम कामगिरी करत विजय मिळवला. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतर ट्रॉफीसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( Social Media Viral Video ) होताना दिसतोय. 

तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने ( West Indies ) टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यावेळी भारताने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 351 रन्स केले. यावेळी वेस्ट इंडिजची टीम अवघ्या 151 रन्सवर ढेपाळली. 

संजूला ट्रॉफीला हातही लावायला दिला नाही

तिसरा आणि निर्णायक वनडे सामना भारताने 200 रन्सने जिंकला. यावेळी सिरीज जिंकल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याकडे ट्रॉफी सोपवण्यात आली. यावेळी जेव्हा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) ट्रॉफी घेऊन टीमसोबत फोटो काढण्यासाठी आला, त्यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. 

या व्हिडीओनंतर असा दावा करण्यात येतोय की, हार्दिकडे संजूला ट्रॉफीला हातंही लावायला दिला नाही. मुळात संजू सॅमसन ( Sanju Samson ) या टीममध्ये नवीन असल्याने त्याला ट्रॉफी न देता त्याने मुकेश कुमारला ट्रॉफी दिली. हार्दिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

पण दुसरीकडे या सामन्यात मुकेश कुमारने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे हार्दिकने त्याच्या हाती ट्रॉफी सोपवली असावी. या सामन्यात त्याने तीन विकेट घेत मुकेशने वेस्ट इंडिजला चांगलेच धक्के दिले. 

संजूने ठोकलं अर्धशतक

संजू सॅमसन ( Sanju Samson ) ने वेस्ट इंडिजविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी केली. संजू या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने 41 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 4 सिक्सेसच्या मदतीने 51 रन्स केले. अर्धशतक झळकावल्यानंतर संजूने यांचं स्वतः श्रेय न घेता ही मोठी धावसंख्या गाठण्याचे श्रेय मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना दिलंय.