या स्टार खेळाडूचा सचिन आणि गावसकर सारख्या दिग्गजांना पछाडत किर्तीमान

या फलंदाजाने सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्करसारख्या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे.  

Updated: Dec 18, 2021, 07:34 PM IST
या स्टार खेळाडूचा सचिन आणि गावसकर सारख्या दिग्गजांना पछाडत किर्तीमान  title=

मुंबई : इंग्लंडचा कर्णधार जो रुटने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात  62 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कर्णधार रुटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (1544) , सुनील गावसकर (1555), सचिन तेंडुलकर (1562), आणि मायकल क्लार्क (1595) या चौघांना पछाडलं आहे. रुट एका कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. (Ashes series Aus vs Eng 2nd test australia vs england captain joe root overtake to sachin tendulkar and sunil gavskar at Adelaide Oval)

एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

मोहम्मद युसूफ, पाकिस्तान - 1 हजार 788 धावा - 2006
विव रिचर्डसन, वेस्टइंडिज - 1 हजार 710 धावा - 1976 
ग्रेम स्मीथ,  दक्षिण आफ्रिका - 1 हजार 656 धावा - 2008
जो रुट, इंग्लंड- 1 हजार 606 धावा - 2021
मायकल क्लार्क, ऑस्ट्रेलिया - 1 हजार 595 धावा - 2012

एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार

ग्रीम स्मिथ, 1 हजार 656 धावा, 2008  
जो रुट, 1 हजार 606 धावा, 2021
मायकल क्लार्क, 1 हजार 595 धावा, 2012
रिकी पॉन्टिंग, 1 हजार 544 धावा, 2005 
बॉब सिम्पसन, 1 हजार 381 धावा, 1964

जो रुटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध लगावलेलं अर्धशतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 52 वं अर्धशतक ठरलं. तर कर्णधार म्हणून रुटचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं हे 12 वं अर्धशतक ठरलं. यासह रुट इंग्लंडकडून सर्वाधिक अर्धशतक लगावणारा कर्णधार ठरला.