ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने छापला नॅपी घालून रडतानाचा फोटो; बेन स्टोक्सने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला "मी कधीपासून..."

Ben Stokes Answer to Australian Newspaper: अ‍ॅशेस टेस्टमधील (Ashes Test) दुसऱ्या सामन्यात जॉनी बेअरस्टोच्या (Jonny Bairstow) विकेटवरुन इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ आमने-सामने आला आहे. दरम्यान, हा वाद आता फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. दोन्ही देशांच्या प्रसारमाध्यमांमध्येही यावरुन शीतयुद्ध सुरु आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 4, 2023, 12:09 PM IST
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने छापला नॅपी घालून रडतानाचा फोटो; बेन स्टोक्सने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला "मी कधीपासून..." title=

Ben Stokes Answer to Australian Newspaper: अ‍ॅशेस टेस्टमधील (Ashes Test) दुसऱ्या सामन्यात जॉनी बेअरस्टोच्या (Jonny Bairstow) विकेटवरुन इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात सुरु असलेला वाद आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विकेटच्या वादामुळे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. दरम्यान, हा वाद आता फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. दोन्ही देशांच्या प्रसारमाध्यमांमध्येही यावरुन शीतयुद्ध सुरु आहे. इंग्लंमधील प्रसारमाध्यमांनी ऑस्ट्रेलिया संघावर निशाणा साधल्यानंतर आता त्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रसारमाध्यमांनी थेट इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सवरच (Ben Stokes) निशाणा साधला आहे. दरम्यान, बेन स्टोक्सने त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

ऑस्ट्रेलियामधील वृत्तपत्र 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन'ने (West Australian) आपल्या पहिल्या पानावरच बेन स्टोक्सचा रडणारं मूल म्हणत फोटो छापला आहे. फोटोमध्ये बेन स्टोक्सला लहान मुलाच्या रुपात दाखवण्यात आलं असून त्याच्या तोंडात दुधाच्या बाटलीची चोखणी दाखवण्यात आली आहे. जॉनी बेअरस्टोच्या विकेटवरुन बेन स्टोक्स एका लहान मुलाप्रमाणे रडत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. 

बेन स्टोक्सचं भन्नाट उत्तर

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने केलेल्या या टीकेला बेन स्टोक्सने खेळाडूवृत्तीने घेत भन्नाट उत्तर दिलं आहे. बेन स्टोक्सन ट्वीट करत म्हटलं आहे की, "हा मी असूच शकत नाही. मी कधीच नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली नाही". बेन स्टोक्सच्या या उत्तरावरुन अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने छापलेल्या या फोटोमागे बेन स्टोक्सने जॉनी बेअरस्टोच्या विकेटवरुन केलेली टीका कारणीभूत आहे. स्टोक्सने जर आपण त्यावेळी क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार असतो तर आपण अपील मागे घेतली असती असं म्हटलं होतं. 

बेन स्टोक्सला सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जॉनी बेअरस्टोच्या विचारण्यात आलं असता, त्याने अंपायर कधीपासून ओव्हर पूर्ण झाल्याची घोषणा करु लागले? अशी विचारणा केली. मैदानातील अंपायर्सनी काही हालचाल केली होती का? ती निर्णायक ओव्हर होती का? मला माहिती नाही. जॉनी आपल्या क्रीझमध्ये होता आणि नंतर बाहेर पडला. त्याला आऊट देण्यात आलं असल्याने मला त्या विषयावर भांडायचं नाही असं बेन स्टोक्सने म्हटलं. 

बेन स्टोक्सने पुढे म्हटलं होतं की, "जर मी दुसऱ्या बाजूला असतो तर अंपारर्सवर अधिक दबाव टाकला असता आणि त्यांनी ओव्हर संपल्याची घोषणा केली होती की नाही याची विचारणा केली असती. मी खेळ भावनेबद्दल अत्यंत गांभीर्याने विचार केला असता आणि मी खऱंच हे करु इच्छितो का? असाही विचार केला असता. मला अशाप्रकारे जिंकायचं आहे का? माझं उत्तर नाही असतं".