...तर सबस्टिट्यूटलाही बॅटिंग! 'ऍशेस'पासून नियम लागू होण्याची शक्यता

वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर आता पुन्हा इंग्लंडची टीम मैदानात उतरणार आहे.

Updated: Jul 17, 2019, 07:58 PM IST
...तर सबस्टिट्यूटलाही बॅटिंग! 'ऍशेस'पासून नियम लागू होण्याची शक्यता title=

लंडन : वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर आता पुन्हा इंग्लंडची टीम मैदानात उतरणार आहे. वनडेनंतर आता इंग्लंडच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात एक टेस्ट मॅच झाल्यानंतर ऐतिहासिक अशा इंग्लंड-ऑस्ट्रेलियातल्या ऍशेस सीरिजला सुरुवात होईल. ऍशेस सीरिजपासून आयसीसीचा सबस्टिट्यूट खेळाडूबाबत नवा नियम लागू होऊ शकतो. एखाद्या खेळाडू्च्या डोक्याला जखम झाली तर त्या खेळाडूऐवजी सबस्टिट्यूट खेळाडू खेळू शकतो.

क्रिकइन्फो या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीच्या सुरु असलेल्या वार्षिक बैठकीत हा नियम लागू करण्याबाबत चर्चा सुरु आहे. या नियमाला मंजुरी मिळून लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या माध्यमातून खेळवण्यात येणाऱ्या सगळ्या टेस्ट मॅचसाठी हा नियम लागू होईल. या नियमामुळे खेळाडूंना सुरक्षाही मिळेल

२०१४ साली ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फिल्प ह्यूजसच्या डोक्याला बॉल लागून त्याचा मृत्यू झाला होता. लिस्ट ए मॅच खेळत असताना फिल्प ह्यूजसच्या डोक्याला बॉल लागला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने स्थानिक मॅचमध्ये हा नियम लागू केला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या शेफील्ड शील्डमध्ये हा नियम लागू करण्यात आला नव्हता.