Hardik Pandya : रविवारी अहमदाबादच्या मैदानावर लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात सामना रंगला होता. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये ( Narendra Modi Stadium ) रंगलेला हा सामना गुजरातने 56 रन्सने जिंकला. दरम्यान या सामन्यात गुजरातच्या फिल्डींगदरम्यान एक अशी घटना घडली ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसतेय. यावेळी गुजरात टायटन्सचा कोच आशिष नेहरा ( Ashish Nehra ) कर्णधार हार्दिक पंड्यावर ( Hardik Pandya ) चांगलाच संतापलेला दिसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात कृणाल पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी गुजरातच्या टीमने प्रथम फलंदाजी करत चांगला खेळ केला. 20 ओव्हर्समध्ये गुजरातने 227 रन्सचा स्कोर केला. यानंतर लखनऊची टीम ज्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरली तेव्हा फिल्डींगदरम्यान त्यावेळी आशिष नेहरा हार्दिक पंड्यावर संतापलेला दिसला. नेमकं असं काय झालं ते पाहूया.
हा सर्व प्रकार दहावी ओव्हर संपल्यानंतर झाला. ही ओव्हर संपल्यानंतर गुजरातच्या टीमकडून फिल्डींग स्लो होताना दिसत होती. अशावेळी स्लो ओव्हर टाकल्यामुळे दंड बसण्याची शक्यता होती. अशावेळी टीमचा कोच आशिष नेहरा कर्णधार हार्दिक पंड्यावर संतापलेला दिसला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की, नेहरा हार्दिकवर चांगलाच संतापलेला दिसला.
— Cricbaaz (@cricbaaz21) May 7, 2023
रविवारी झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सचा 56 रन्सने विजय झाला होता. टॉस जिंकून लखनऊने गुजरातला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात गुजरातच्या ओपनर्सने चांगला खेळ केला. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांच्या ओपनिंग जोडीने चांगला खेळ केला. साहाने 81 तर गिलने 94 रन्सची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने 228 रन्सचं टार्गेट लखनऊला दिलं.
या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा ओपनक क्विंटन डी कॉकने 70 रन्सची तुफानी खेळी केली. याशिवाय कायली मायर्स यानेही 48 रन्स केले. मात्र याशिवाय कोणत्याही फलंदाजाला 30 रन्सचा आकडा गाठता आला नाही. लखनऊची टीम 20 ओव्हर्समध्ये 171 रन्सपर्यंत मजल मारू शकली.