Asia Cup 2022 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्याआधी या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

भारत-पाक हायव्होल्टेज सामन्याआधी मोठी बातमी

Updated: Sep 4, 2022, 01:14 PM IST
Asia Cup 2022 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्याआधी या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती title=
asia cup 2022 bangladesh mushfiqur rahim retire t20i cricket before ind vs pak highvoltage match

मुंबई : बांगलादेशचा विकेटकीपर -बॅट्समॅन मुशफिकुर रहीमने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) त्याने शेवटचा सामना खेळला होता. टी-20 आशिया कपमध्ये बांगलादेश संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. संघाला ग्रुप स्टेजमधूनच बाहेर व्हावे लागले.

बांगलादेशने आशिया कप 2022 मध्ये खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामोरं जावं लागलं. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने मात केली. या दोन्ही सामन्यात मुशफिकुर रहीमची कामगिरी निराशाजनक होती.