परंपरा प्रतिष्ठा अनुशासन! पाकिस्तानी खेळाडूंकडून पुन्हा कॅच ड्रॉप, श्रीलंकेला 6 रन्सचा बोनस

पाकिस्तानने आपल्या खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आशिया कपच्या फायनलमध्येही कायम ठेवलं.

Updated: Sep 11, 2022, 11:12 PM IST
परंपरा प्रतिष्ठा अनुशासन! पाकिस्तानी खेळाडूंकडून पुन्हा कॅच ड्रॉप, श्रीलंकेला 6 रन्सचा बोनस title=

दुबई : आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने 170 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आशिया कपवर नाव कोरण्याची पाकिस्तानला आता 171 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागणार आहे. यादरम्यान पाकिस्तानने परंपरा प्रतिष्ठा अनुशासनप्रमाणे पुन्हा एक चूक केली आहे. भानुका राजपक्षेचा कॅच पकडताना दोन पाकिस्तानी फलंदाज एकमेकांना धडकले.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

अर्धशतक झळकावल्यानंतर भानुका शेवटच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात होता. मोहम्मद हसनैनच्या 19 व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडू भानुकाने डीप मिडविकेटच्या सीमारेषेकडे उंच मारला होता. सीमारेषेजवळ आसिफ अली चेंडू पकडण्यासाठी धावला आणि झेल घेण्याच्या प्रयत्नात होता इतक्यात धडक बसली.

 

 

त्यानंतर पलीकडून शादाब खानही न बघता झेल घेण्यासाठी पोहोचला आणि थेट आसिफला धडकला. शादाबच्या डोक्याला लागताच आसिफच्या हातातून चेंडू पडला आणि भानुकाला जीवदान मिळालं. एवढंच नाही तर चेंडू आसिफ अलीच्या हातातून उडी मारून थेट सीमारेषेवर 6 धावांवर पडला. 

दरम्यान, कॅच सोडतानाचा व्हिडीओ  सोशल मीडियावर जोरदार व्हायरल  झाला आहे.