Asia Cup 2022 : सूर्यकुमारचा धमाका, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, विराटचाही रेकॉर्ड ब्रेक

Asia Cup 2022 : मुंबईकर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्याने 68 धावांची वादळी खेळी केली. 

Updated: Sep 1, 2022, 04:09 PM IST
Asia Cup 2022 : सूर्यकुमारचा धमाका, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, विराटचाही रेकॉर्ड ब्रेक title=

दुबई : टीम इंडियाने हॉंगकॉंगवर 40 धावांनी (Team India vs Hong Kong) विजय मिळवला. मुंबईकर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्याने 68 धावांची वादळी खेळी केली. यासह सूर्याने मोठा रेकॉर्ड केलाय. तसेच सूर्याने विराट कोहलीचाही (Virat Kohli) विक्रम मोडीत काढलाय. (asia cup 2022 ind vs hkg team india suryakumar yadav become 1st indian who hit most sixes in single t20i match competition also break virat record)

सूर्याने 26 बॉलमध्ये 68 रन्सची जोरदार खेळी केली. सूर्याच्या या खेळीमुळेच टीम इंडियाचा विजय सोपा झाला. याआधी टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत 192 धावा केल्या. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर हाँगकाँगचा 152 धावांवर ऑलआऊट झाली. या विजयासह भारताने सुपर 4 मध्ये एन्ट्री केली. 

सूर्याने या खेळीत अनेक विक्रम केले. सूर्यकुमार एशिया कपमधील टी 20 फॉर्मेटमधील एका सामन्यात सर्वाधिक सिक्स ठोकणारा पहिला भारतीय ठरला. याआधी एशिया कप टी 20 स्पर्धेत 3 पेक्षा अधिक सिक्स ठोकले नव्हते. मात्र सूर्याने चक्क 6 सिक्स ठोकले.  

विराटचा रेकॉर्ड ब्रेक

सूर्यकुमार सामन्याच्या कोणत्याही डावातील शेवटच्या 5 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याबाबत दुसऱ्या स्थानी पोहचलाय. सूर्यकुमारने हॉंगकॉंग विरुद्ध 53 धावा चोपल्या. याआधीने विराटने 2016 मध्ये विंडिज विरुद्ध आणि 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटच्या 5 ओव्हरमध्ये प्रत्येकी 49 धावा केलेल्या.