Asia Cup Points Table & Equation: 10 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना रंगला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या ( Asia Cup 2023 ) ओपनर्सने हा निर्णय पाकिस्तानला फायदेशीर ठरू दिला नाही. दरम्यान टीम इंडियाचे 147 रन्स झाले असताना पावसाने खोडा घातला. पाऊस इतका होता की, पुढे सामना खेळवता आला नाही. अखेर हा सामना 11 तारखेला खेळवला जाणार आहे.
हा सामना रिझर्व्ह डेला म्हणजेच सोमवारी खेळवला जाणार आहे. मात्र चाहत्यांच्या मनात भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना राखीव दिवशीही पूर्ण होऊ शकला नाही आणि हा सामना रद्द करावा लागला तर काय होणार? जर हा सामना देखील रद्द झाला तर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचू शकेल का? यानंतर समीकरणं कसं असणार आहे हे पाहूयात
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी पावसाने खेळ केला तर सोमवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचे फायनल खेळण्याचे स्वप्न भंगणार का? जर सामना रद्द झाला तर दोन्ही टीमला प्रत्येकी 1-1 गुण मिळणार आहे. अशा प्रकारे 2 सामन्यांनंतर पाकिस्तानचे 3 गुण होणार आहेत. तर भारतीय टीमचा 1 सामना खेळल्यानंतर 1 गुण होणार आहे.
सुपर 4 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध ( India vs Pakistan ) सुरु आहे. पाकिस्ताननंतर भारतीय टीम श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव केल्यास 5 गुणांसह फायनलमध्ये पोहोचेल.
जर पाकिस्तानविरूद्धचा सामना रद्द होऊन टीम इंडिया श्रीलंका किंवा बांगलादेशविरुद्धचा कोणताही सामना हरला तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला इतर टीमच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. पाकिस्तानने मागील सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. बांगलादेशने सुपर-4 फेरीत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. शाकिब अल हसनच्या संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यावेळी श्रीलंकेने पहिल्या सुपर-4 फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. अशा प्रकारे श्रीलंकेच्या टीमचे 2 गुण झाले आहेत. त्यामुळे अशावेळी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातील विजयी टीम अंतिम फेरीसाठी जवळपास पात्र ठरणार आहे.