close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आशिया कप : बांगलादेशची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये, रवींद्र जडेजाचं जोरदार पुनरागमन

आशिया कपच्या सुपर-४ मध्ये भारताचा मुकाबला बांगलादेशशी आहे.

Updated: Sep 21, 2018, 06:37 PM IST
आशिया कप : बांगलादेशची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये, रवींद्र जडेजाचं जोरदार पुनरागमन

दुबई : आशिया कपच्या सुपर-४ मध्ये भारताचा मुकाबला बांगलादेशशी आहे. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. ग्रुप स्टेजच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता. तर कालच झालेल्या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं बांगलादेशला हरवलं होतं. पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या मॅचनंतर या मॅचमध्ये भारतीय टीमनं एक बदल केला आहे. हार्दिक पांड्याऐवजी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे तो आशिया कपला मुकणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी मैदानातच हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. स्ट्रेचरवरून पांड्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं.

भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, एम एस धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

बांगलादेश टीम

लिटन दास, नझमुल हुसेन शंटो, शाकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथून, महमदुल्लाह, मोसडेक हुसेन, महेदी हसन, मशरफी मुर्तजा, रुबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा