Australia Squad For Women T20 World Cup 2024 : आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे सोपवण्यात आले होते, मात्र सध्या बांगलादेशमध्ये आरक्षणावरून असंतोषाचे वातावरण आहे. तेव्हा महिला टी 20 वर्ल्ड कप यंदा यूएईमध्ये खेळवण्यात येईल. आगामी महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांचा संघ जाहीर केलेला आहे.
यंदा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवण्यात येईल. आतापर्यंत 6 वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने या स्पर्धेसाठी आपली टीम जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाची दिग्गज महिला क्रिकेटर एलिसा हीली हिच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. मागील काही महिन्यांपासून पायाच्या दुखापतीने त्रस्त असलेली गोलंदाज डार्सी ब्राउन ही आता बरी झाली असून तिला 15 खेळाडूंच्या वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आलेला आहे. तर अनुभवी फिरकीपटू जेस जोनासेन हिला सुद्धा टीममध्ये स्थान देण्यात आलंय. याशिवाय वेगवान गोलंदाज तायला व्लामिनक हिला सुद्धा वर्ल्ड कप संघात संधी देण्यात आलीये.
हेही वाचा : शिखर धवनने स्विकारली युवराज सिंगची ऑफर, गब्बर आता 'या' संघाकडून खेळणार?
महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहेत. एक दोन वेळा नाही तर तब्बल 6 वेळा ऑस्ट्रेलियाने महिला टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय. पहिल्यांदा 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वर्ल्ड चॅम्पिअनचा खिताब पटकावला होता. त्यानंतर 2012, 2014, 2018, 2020, 2023 या वर्षी सुद्धा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली. ऑस्ट्रेलियाची महिला टीम पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज आहे.
एलिसा हिली (कर्णधार), ताहलिया मॅक्ग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, एश्ले गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, एलाना किंग, फोबी लिचफील्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पॅरी, मेगन शुट, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेयरहॅम, टेयला व्लामिन्क