World Cup 2023 Final : पाणावलेले डोळे अन् हताश चेहरे असा नजारा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम पहायला मिळाला. वर्ल्ड कप फायनलमध्ये (World Cup 2023) ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव करून सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 241 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रेविस हेड (Travis Head) याने दमदार शतक ठोकून ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवलं आहे.
#TeamIndia put up a solid fight but it was not our night in the #CWC23 #Final.
Congratulations to Australia. #MenInBlue | #INDvAUS pic.twitter.com/4LhcDVNXVu
— BCCI (@BCCI) November 19, 2023
टीम इंडियाने दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया आक्रमक फलंदाजीच्या मुडमध्ये मैदानात उतरली होती. मात्र, रोहितने इथं मास्टरप्लॅन आमलात आणला. मोहम्मद शमीला सुरूवातीच्या स्पेलमध्ये गोलंदाजीला आणलं अन् शमीने कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने आक्रमक गोलंदाजीचं प्रदर्शन करत दोन विकेट्स काढल्या. पण ऑस्ट्रेलियाने रनरेट खाली पडून दिला नाही. रोहितने स्पिनर्सला पिच्चरमध्ये आणलं अन् ऑस्ट्रेलियाने लय पकडली. टीम इंडियाला खरा धोका होता, तो ट्रेविस हेड याच्याकडून... मात्र, गोलंदाज फ्लॉप ठरत गेले. ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकीय भागेदारी केली अन् टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवलं. पिच जसं जसं स्लो झालं, तसं तसं शमीची स्विंग चालली ना शमीचा यॉर्कर.. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 130 कोटी भारतीयांचं मन तोंडून वर्ल्ड कपवर कब्जा मिळवला आहे.
टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली ती कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) आक्रमक अंदाजामुळे... रोहित शर्माने धुंवाधार सुरूवात केली मात्र, शुभमन गिलने (Shubman Gill) चूक केली अन् हातात कॅच देऊन बसला. रोहित आणि विराटने (Virat Kohli) डाव सावला पण रोहितने मॅक्सवेलला सिक्स मारण्याच्या नादात बाद झाला. सर्वांना अपेक्षा असलेला श्रेयस अय्यर कमाल दाखवू शकला नाही. 11 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 81 धावा केल्या खऱ्या पण 3 विकेट्स पडल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या आशा मावळल्या. केएल राहुलने अर्धशतक ठोकलं पण त्याला टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवता आलं नाही. ज्यांच्याकडून फिनिशिंगची अपेक्षा होती, त्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना महत्त्वाच्या सामन्यात खेळता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियाला फक्त 240 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क याने 3 तर जॉश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी 2-2 विकेट्स नावावर केल्या.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.