मुंबई : क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी बातमी येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या मृत्यूमुळे फिरकीचा जादूगार हरपल्याची भावना क्रिकेट विश्वातून व्यक्त केली जात आहे. (australia legendary spinner shane warne dies aged of 52 suspected heart attack)
शेन वॉर्नची क्रिकेट कारकिर्द
शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने 37 वेळा 5 विकेट्स तर 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एका कसोटी सामन्यात 128 धावा देऊन 12 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती.
तर 194 वनडे मॅचमध्ये त्याने 293 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. वॉर्नची वनडेमधील 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.
आयपीएलमधील कामगिरी
शेन वॉर्नने आपल्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सला आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं होतं. वॉर्न आयपीएलमध्ये 55 मॅचमध्ये 57 विकेट्स घेतल्या होत्या.
BREAKING: Australian cricket icon Shane Warne has died aged 52.
“Shane was found unresponsive in his villa and despite the best efforts of medical staff, he could not be revived,” Warne's management have confirmed in a statement.
— Nic Savage (@nic_savage1) March 4, 2022