Virat Kohli | इतकं परफेक्ट कसं काय? विराटबाबतची ती भविष्यवाणी खरी ठरली!

विराट कोहली (Virat Kohli) 100 व्या सामन्यात 45 धावा करुन तंबूत परतला. विराटला श्रीलंकेचा स्पीनर लसिथ एमबुलडेनियाने (Lasith Embuldeniya) बोल्ड केलं.

Updated: Mar 4, 2022, 07:23 PM IST
Virat Kohli | इतकं परफेक्ट कसं काय? विराटबाबतची ती भविष्यवाणी खरी ठरली! title=

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीतील (Ind vs Sl 1st Test) पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने (Team India) पहिल्या दिवशी 85 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 357 धावा केल्या. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) हा 100 वा कसोटी सामना होता. त्यामुळे विराटसाठी हा सामना फार महत्त्वाचा होता. या सामन्यात विराट बहुप्रतिक्षित 71 वं शतक ठोकेल, अशी सर्व क्रिकेट चाहत्यांना आशा होती. मात्र विराट 45 धावांवर आऊट झाला. मात्र विराट 45 धावांवर बाद होईल, अशी भविष्यवाणी आधीच झाली होती अन् विराट 45 धावांवर आऊट झाल्याने सर्वच अवाक झाले आहेत. (ind vs sl 1st test day 1 team india virat kohli out on 45 runs prediction tweet viral lasith embuldeniya)

विराटबाबत भविष्यवाणी 

विराट 100 व्या सामन्यात 45 धावा करुन तंबूत परतला. विराटला श्रीलंकेचा स्पीनर लसिथ एमबुलडेनियाने बोल्ड केलं. मात्र हैराण करणारी बाब म्हणजे विराटच्या आऊट होण्याबाबत एका व्यक्तीने भविष्यवाणी करण्यात आली होती. ट्विटरवरुन @Quick__Single या यूझर्सने ही भविष्यवाणी केली. ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. 

ट्विटमध्ये काय?

श्रुती नावाच्या यूजरने रात्री 12 वाजून 46 मिनिटांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये विराट शतक लगावू शकणार नाही. विराट 100 चेंडू खेळून 45 धावांवर आऊट होईल, असं ट्विट केलं. सामन्यादरम्यान अगदीच तसं झालं. 

इतकंच नाही, तर या यूझरने विराट कोणता बॉलर आऊट करणार हे सुद्धा सांगितलं होतं.  विराट लसिथ एम्बुलदेनियाच्या बॉलिंगवर आऊट होईल, अशी भविष्यवाणी करण्यात आली. कहर म्हणजे विराट आऊट झाल्यानंतर हैराण होईल, असंही या ट्विटमध्ये म्हटलं होतं. ही भविष्यवाणी खरी ठरवल्याने अगदी क्रिकेटपटूही हैराण झाले आहेत. 

विराटच्या 8 हजार धावा पूर्ण

विराटकडून या सामन्यात शतकी खेळीची अपेक्षा होती. विराटने अखेरचं शतक हे 2 वर्षांआधी झळकावलं होतं. त्यामुळे विराटने या सामन्यात शतक लगावून हा 100 वा सामना आणखी यादगार करावा, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा होती. मात्र विराटने क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. मात्र त्याने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं.  

विराटने 76 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे विराटने 38 वी धाव घेत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 8 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विराट यासह 8 हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव आणि मोहम्मद शमी.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन :  दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चरिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, विश्व फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा