ऑस्ट्रेलियाचा (Australia) फलंदाज मार्कस स्टॉइनिसने (Marcus stoinis) पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनवर (Mohammad hasnain) गंभीर आरोप केला आहे. 'द हंड्रेड'मध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल आणि सदर्न ब्रेव्ह यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसला मोहम्मद हसनैनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने मार्कसला 37 धावांवर बाद केले.
त्याचवेळी बाद झाल्यानंतर मार्कस अजिबात खुश दिसत नव्हता आणि मैदानाबाहेर जाताना त्याने हसनैनवर गंभीर आरोप केले. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने मोहम्मद हसनैन चकिंग केल्यासारखे हातवारे केले. मार्कसचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना राग अनावर झाला आहे. त्यांनी स्टॉइनिसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
या सामन्यात मार्कस स्टॉइनिसने 27 चेंडूत 37 धावा केल्या. त्याला मोहम्मद हसनैनने बाद केले. आऊट झाल्यानंतर स्टॉइनिसला राग अनावर झाला. जेव्हा स्टॉइनिस आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये जाऊ लागला तेव्हा त्याने हसनैनच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती केली. या आरोपानंतर पाकिस्तानी चाहते नाखूश झाले आणि त्यांनी स्टॉइनिसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Disappointing reaction from Marcus Stoinis after he was dismissed by Mohammad Hasnain. How about sticking to playing cricket and letting the officials do their job #TheHundred #Cricket pic.twitter.com/oYOSb12GTr
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) August 14, 2022
त्याला नेहमीच लोकांच्या अॅक्शनच नेहमीच चुकीची वाटते. पण मार्कसला सांगायचे आहे की ऑस्ट्रेलियाचे आयसीसीमध्ये एक केंद्र आहे जे त्यांना गोलंदाजी करण्यास परवानगी देते. त्यामुळे जा आणि तुम्हाला त्यात काही समस्या असल्यास त्याचे निराकरण करा.
They always have problem with people action. But to let Marcus know it's Aus center in ICC which give him permission to bowl so go and fix that if you have problem with this. Typical Aussies thing.
— Mdkm (@madkin256) August 14, 2022
त्याला आयसीसीच्या अधिकृत टीमने परवानगी दिली आहे. मार्कसची हिम्मत कशी झाली? जर तू त्याला खेळू शकत नाहीस तर हेच कर
He was cleared by icc official team
How dare you Marcus if you cant play him then do this
Bust...... Aus— Pat (@ImCutie_56) August 15, 2022
अधिकार्यांनी अशा प्रतिक्रियेकडे डोळेझाक केली पाहिजे. तिरस्कार!
Authrities must be blind to such reaction. Disgusting! Poor whining Aussie
— Sikander Zishan (@zishan_khawaja) August 15, 2022
स्टॉइनिसचे डोके तसेही कुठे चालते
Stoinis ka dimagh wese b kahan chalta hai. pic.twitter.com/qcEmS8Q4nh
— Rajesh Kumar Batra(@MrRajeshbatra) August 15, 2022