मुंबई : टीम इंडियाने आगामी आशिया कपसाठी (Asia cup) संघाची घोषणा केली आहे. या संघात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh karthik) या दोघांना संधी देण्यात आली आहे. या दोघांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या दोघांमधून कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचं हा सवाल टीम मॅनेंजमेंटला पडलाय. त्यात या दोघांमधून एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यावरच आता ऋषभ पंतने (Rishabh Pant) थेट प्रतिक्रिया दिलीय. त्याच्या या प्रतिक्रियेची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा होतेय.
आशिया कप 2022 च्या संघात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh karthik) या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण स्थान मिळवेल हा प्रश्न अजूनही कायम आहे. दोघांच्या कामगिरीवर नजर टाकली तर ऋषभ पंत (Rishabh Pant) चांगलाच लयीत दिसला आहे. मधल्या फळीशिवाय त्याने टॉप ऑर्डरमध्येही फलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे पंत तुम्हाला फलंदाजीच्या क्रमात डाव्या हाताने फलंदाज असण्याचाही पर्यायही देतो. अशा परिस्थितीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कार्तिकचा परफॉर्मन्स
आयपीएल 2022 व्यतिरिक्त, कार्तिकने (Dinesh karthik) अलीकडच्या काळात भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका बजावलीय. त्यामुळेच आशिया कपसाठी त्याची खास निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात परतल्यानंतर दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिले अर्धशतक होते. आयपीएलमधील त्याची कामगिरी आणि त्याचा अनुभव आगामी मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला उपयोगी पडेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळवण्याची शक्यता जास्त आहे.
पंत काय म्हणाला?
ऋषभ पंत आणि कार्तिक (Dinesh karthik) एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याचे म्हणत, त्यांच्यातील स्पर्धेबद्दल विचारण्यात आले होते. यावर पंतने सांगितले की, 'आम्ही त्या गोष्टींचा विचार करत नाही. आम्ही वैयक्तिकरित्या नेहमीच आमचे 100 टक्के संघाला देऊ इच्छितो. बाकी प्रशिक्षक आणि कर्णधार हे त्यांच्या संघाला कसा फायदा होतो यावर अवलंबून आहे.
दरम्यान आता आशिया कपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत की कार्तिकला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.