एकही पराभव नाही तरी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाऊस पाणी फिरवण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 6, 2017, 06:59 PM IST
एकही पराभव नाही तरी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? title=

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाऊस पाणी फिरवण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियानं खेळलेल्या दोन्ही मॅच पावसानं रद्द झाल्यामुळे त्यांना प्रत्येक मॅचचा एक पॉईंट देण्यात आला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सोमवारी झालेली ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशमधली मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली.  मॅच रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशला प्रत्येकी एक पॉईंट देण्यात आला

याआधी ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडविरुद्ध झालेली मॅचही पावसामुळे रद्द झाली होती. या मॅचमध्येही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी एक पॉईंट देण्यात आला होता. या दोन मॅचचे मिळून ऑस्ट्रेलियाकडे आता फक्त दोनच पॉईंट आहेत.

ऑस्ट्रेलियाची पुढची मॅच आता इंग्लंडबरोबर आहे. ही मॅच म्हणजे ऑस्ट्रेलियासाठी करो किंवा मरोची लढाई असणार आहे. इंग्लंडविरुद्धची मॅच ऑस्ट्रेलियानं जिंकली तरी ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि बांग्लादेशविरुद्ध न्यूझीलंडच्या मॅचच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.