सुनील गावस्कर-कपिल देव यांचा 'तो' विक्रम 38 वर्षांनी मोडला

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचा 38 वर्षांनी विक्रम मोडणारा तो क्रिकेटपटू कोण? पाहा 

Updated: Dec 9, 2021, 03:54 PM IST
सुनील गावस्कर-कपिल देव यांचा 'तो' विक्रम 38 वर्षांनी मोडला

मुंबई: सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचा विक्रम 38 वर्षांनी एक ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं मोडला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एशेज 2021-22 पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर होत आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रेविस हेड याने दुसऱ्या दिवशी तुफान फलंदाजी केली. 

ट्रेविस हेडने 85 चेंडूमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं कसोटी कारकिर्दीतील तिसरं शतक झळकवलं. ऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेटमधील हे 9वे जलद शतक असल्याचं म्हटलं आहे. डेव्हिड वॉर्नरचं शतक थोडक्यात हुकलं. लॅबुशेननं 74 धावा केल्या आहेत. 

सुनील गावस्कर यांनी 1983 मध्ये 94 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. महेंद्रसिंह धोनीनं 2005-06 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 93 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. 2018 मध्ये शिखर धवनने 87 बॉलमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. 

ट्रेविसने 85 बॉलमध्ये सर्वात जलत गतीनं शतक झळकवत आपलं नाव या यादीमध्ये समाविष्ट केलं आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 343 धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाकडे 196 धावांची आघाडी आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 147 धावांवर बाद झाला. हेड 112 धावा तर मिचेल स्टार्क 10 धावांवर नाबाद आहे. अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावल्या. डेव्हिड वॉर्नरचे शतक अवघ्या 6 धावांनी हुकले तर कॅमेरून ग्रीन खाते न उघडता बोल्ड झाला. वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने दोघांची विकेट घेतली.