अद्भुत अकल्पनीय अविश्वसनीय...! T20 World Cup मधील सर्वांत भन्नाट कॅच, पाहा Video

Aus VS Ire : World Cup इतिहासातील सर्वांत भन्नाट फिल्डींग पहायला मिळाली. ही फिल्डींग पाहिल्यावर अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत. इवलुश्या आयर्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला घाम फोडला.

Updated: Oct 31, 2022, 05:05 PM IST
अद्भुत अकल्पनीय अविश्वसनीय...! T20 World Cup मधील सर्वांत भन्नाट कॅच, पाहा Video title=
australia vs ireland match barry mccarthy

Australia vs Ireland, McCarthy : सध्या सुरू असलेल्या T20 World Cup मध्ये रोमांचक सामने पहायला मिळत आहेत. ब्रिसबेनच्या मैदानावर Australia आणि Ireland यांच्यात 31 वा सामना खेळला जातोय. या सामन्यात दोन्ही संघ पुर्ण ताकदीनिशी खेळताना दिसत आहेत. अशातच आता World Cup इतिहासातील सर्वांत भन्नाट फिल्डींग पहायला मिळाली. ही फिल्डींग पाहिल्यावर अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने (Australia) धुंवाधार बँटिंग केली. 20 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 179 धावा कुटल्या. एकीकडे विकेट जात असताना, कँप्टन अॅरोन फिंचने 63 धावांची तातडीची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या आशा कायम ठेवल्या. तर स्टोनिसने देखील 35 धावा करत मोलाची साथ दिली. इवलुश्या आयर्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला घाम फोडला. आयर्लंडच्या खेळाडूंनी पुर्ण ताकद लावून फिल्डींग केल्याचं दिसून आलं.

T20 World Cup इतिहासातील सर्वांत भन्नाट फिल्डींग...

झालं असं की... ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू होती. सामन्याची 15 वी ओव्हर सुरू होती. त्यावेळी स्टोनिस (Stonis) आणि फिंच (Finch) मैदानावर राडा घातल होते. त्याचवेळी 15 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर स्टोनिसने जोरदार फटका मारला. स्टोनिसचा फटका गगनाला भिडला. त्यावेळी बँड्री लाईनवर मात्र, बॅरी मॅककार्थी (Barry McCarthy) उभा होता.

आणखी वाचा - Ind vs SA सामन्यात हा ठरला टर्निंग पॉईंट, स्टेडियमवर पसरली शांतता

लाँग ऑफला (Long Off) थांबलेल्या बॅरीने बँड्रीच्या सीमेवर उडी मारत बॉल सिक्स जाण्यापासून वाचवला. त्याने 5 फुट उंच उडी घेतल्याचं दिसतंय. त्यानंतर दुसऱ्या फिल्डरने बॉल थ्रो केला. यावेळी बॅरीला जबर मार लागल्याचं देखील पहायला मिळालं.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 179 धावा केल्यानंतर आयर्लंडची (Ireland) सुरूवात खराब झाली. टक्कर्स एकाकी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना टक्कर देताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाने एक मॅच हारल्यामुळे आता आजचा सामना त्यांच्यासाठी करो किंवा मरोचा आहे. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी आयर्लंडला 19 चेंडूत 47 धावांची गरज आहे.