मुंबई : आशिया कपवर (Asia cup 2022) कोणता संघ नाव कोरतो याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे. त्यातच आता आशिया कप नंतर सर्व संघाच्या नजरा आता टी20 वर्ल्डकपवर (T20 World Cup) लागल्या आहेत. या टी20 वर्ल्डकप आधीच एका खेळा़डूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू कोण आहे ? व टी20 वर्ल्डकप आधी निवृत्ती का घेतोय ते जाणून घेऊयात.
टी20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) सर्वच संघ तयारी करत आहेत. काही संघानी तर या मास्टरप्लॅन देखील आखला आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने तर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू मेथ्यू हेडनला मेटॉर म्हणून घेतले आहे. त्यामुळे मेथ्यू हेडनच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान कसे परफॉर्म करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर टीम इंडियाकडून (Team India) सुद्धा संघ निवडीवरून विचारविमश सुरु आहे. लवकरच संघ जाहीर होण्याची शक्यता आहेत.
एकिकडे सर्वंच संघ टी20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) तयारी करत असताना ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि टी-20 कर्णधार अॅरॉन फिंच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अॅरॉन फिंचने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. खराब फॉर्ममुळे फिंचने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलिया वेबसाइट न्यूज कॉर्पने या संदर्भातल वृत्त दिलं आहे.
खराब फॉर्मचा सामना
अॅरॉन फिंच (Aaron Finch) खराब फॉर्मचा सामना करत आहे. फिंचने यावर्षी 13 एकदिवसीय डावात केवळ 13 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. हा खेळाडू 5 वेळा शून्यावर बाद झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अॅरॉन फिंच शून्यावर बाद झाला आणि यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. फिंच एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शुन्यावर बाद होणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे.
शुन्यावर बाद होण्याचा विक्रम
एकदिवसीयच नाही तर टी-२० मध्येही फिंचची खराब कामगिरी सुरूच आहे. अॅरॉन फिंच (Aaron Finch) सर्वाधिक 0 धावा काढून बाद होणारा कर्णधार ठरला आहे. फिंच कर्णधार म्हणून 6 वेळा सलामी करताना शुन्यावर बाद झाला. त्याच्यानंतर बाबर आझमचा नंबर येतो. तो 4 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
दरम्यान खराब फॉर्ममुळे अॅरॉन फिंचने (Aaron Finch) निवृत्तीचा निर्णय घेतलाय. त्याच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसणार आहे.