माझी होशील का...? ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भारतीय तरुणीला लग्नाची मागणी

जवळपास गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ.... 

Updated: Feb 27, 2020, 11:03 AM IST
माझी होशील का...? ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भारतीय तरुणीला लग्नाची मागणी
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : प्रेमाची नाती ही फक्त या भावनेवरच टीकून असतात असं नाही. तर, या नात्यांमध्ये एकमेकांवर असणारा विश्वास आणि खडतर प्रसंगीही एकमेकांना असणारी साथ, हे सारंकाही या नात्याला अधिक दृढ करणारं ठरत असतं. गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियाचा एक क्रिकेटपटू अशाच खास नात्यात रमला आहे. मुळात त्याचं हे नातं खास असण्याचं कारण म्हणजे, त्याची जोडीदार ही भारतीय वंशाची आहे. त्यामुळे भारतीयांसाठीही ही तितकीच चर्चेची बाब. 

जवळपास गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ एका सुरेख अशा रिलेशनशिपमध्ये असणारा हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू म्हणजे ग्लेन मॅक्सवेल Glenn Maxwell. कारकिर्दीतील संघर्षाच्या काळाचा सामना करणाऱ्या ग्लेनला सध्या साथ मिळाली आहे ती म्हणजे भारतीय वंशाची त्याची प्रेयसी विनी रमन हिची. 

काही दिवसांपूर्वीच क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूने माझी होशील का...? असं विचारत विनीला लग्नाची मागणी घातली. सोशल मीडियावर खुदद् विनी आणि ग्लेननेच याविषयीची आनंदाची बातमी दिली. ग्लेनच्या मागणीला होकारार्थी उत्तर देत या जोडीने सोशल मीडियावरुन चाहत्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घेतलं. ज्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. 

 
 
 
 

A post shared by VINI (@vini.raman) on

गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वापासून दूर असणारा ग्लेन मॅक्सवेल हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यात अतिशय आनंददायी क्षणांचा आनंद घेत आहे. विनीला लग्नासाठी मागणं घालणाऱ्या ग्लेनला तिचा होकार मिळाल्यामुळे आता ही जोडी विवाहबंधनात कधी अडकते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.