बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा लवकरच या सुपरस्टारशी बांधणार लगीनगाठ

भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (Jwala Gutta) लवकरच या सुपरस्टारशी विवाहबंधनात अडकणार आहे.  

Updated: Mar 23, 2021, 08:26 AM IST
बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा लवकरच या सुपरस्टारशी बांधणार लगीनगाठ
Photo- (Twitter)

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (Jwala Gutta) लवकरच तमिळ सुपरस्टार विष्णू विशाल (Vishnu Vishal) यांच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. विशालने याचा खुलासा आपल्या 'अरण्या' या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंट दरम्यान केला. गेल्या वर्षी या जोडप्याने आपल्या लग्नाची बातमी लोकांना दिली. यानंतर आता या तमिळ अभिनेत्यानेही लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आहे की हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत.

विशाल कोण आहे?

विष्णू विशाल (Vishnu Vishal) हा तमिळ सिनेमाचा एक मोठा सुपरस्टार आहे. चित्रपटाच्या जगाशिवाय तो आपल्या भव्य शरीर यष्टीबाबत खूप चर्चेत असतो. तो लवकरच दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार असणाऱ्या राणा दुग्गूबातीसमवेत 'अरण्या' या चित्रपटात दिसणार आहे. विष्णूने सांगितले की, ज्वाला गुट्टा त्याच्या 'अरण्या' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नेहमीच त्याच्यासोबत होती.

लवकरच दोघांचे लग्न

इस तमिल सुपरस्टार के साथ जल्द शादी के बंधन में बंधेंगी बैडमिंटन स्टार Jwala Gutta

विष्णू विशाल (Vishnu Vishal) यांने माध्यमांशी बोलताना खुलासा केला की लवकरच तो ज्वालाबरोबर (Jwala Gutta) लग्न करणार आहे. तो म्हणाले, 'आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. मी याबद्दल खूप आनंदी आहे. आम्ही लवकरच लग्नाची तारीख जाहीर करू. विशाल आणि ज्वाला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे त्यांच्या सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असताना पाहायला मिळत आहे.

पहिल्या लग्नानंतर दोघांचेही घटस्फोट 

विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा या दोघांनी पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला. विशालने प्रथम रजनीशी लग्न केले. इतकेच नाही तर त्याला एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आर्यन आहे. तथापि, मतभेदांमुळे या दोघांचा घटस्फोट 2018 मध्ये झाला. त्याच वेळी ज्वालाचे (Jwala Gutta) चेतन आनंदशी लग्न झाले आणि 2011 मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला आहे.