बांगलादेशचे क्रिकेटपटू म्हणतायत, हम होंगे कामयाब

न्यूझीलंडला हरवत बांगलादेश संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. या विजयानंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी चांगलाच जल्लोष केला.

Updated: Jun 13, 2017, 05:51 PM IST
बांगलादेशचे क्रिकेटपटू म्हणतायत, हम होंगे कामयाब title=

लंडन : न्यूझीलंडला हरवत बांगलादेश संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. या विजयानंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी चांगलाच जल्लोष केला.

बांगलादेशची पुढची लढत १५ जूनला भारताविरुद्ध होणार आहे. आयसीसीच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवल्यानंतर बांगलादेशने जल्लोष साजरा केला. बांगलादेशचा क्रिकेटर तस्कीन अहमदने सोशल मीडियावर जल्लोषाचा व्हिडीओ शेअर केलाय. यात बांगलादेशचे क्रिकेटर हम होंगे कामयाब...हम होंगे कामयाब हे गाणं बांगलादेशच्या भाषेत म्हणतायत.