कोलंबो : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश. जो संघ जिंकणार त्याची फायनलमध्ये भारताशी गाठ पडणार. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते.
श्रीलंकाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १५९ धावा केल्या. या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला खरा. मात्र या सामन्यात बांगलादेशच्या टीमने अयोग्य वर्तन केले.
बांगलादेशच्या विजयापेक्षा त्यांच्या वर्तनामुळे ही मॅच अधिक चर्चेत आली. अखेरच्या षटकांत सामन्यातील रोमांच आणखीनच वाढला
अखेरच्या षटकांत बांगलादेशला विजयासाठी १२ धावांची गरज होती. यावेळी इसुरु उदानाने अखेरच्या षटकातील पहिला बॉल मुस्तफीझुर रेहमानच्या दिशेने टाकला. मात्र बाऊंसर असल्याने तो खेळला नाही. त्यानंतर पुढचा बॉलही बाऊंसर होता. यावर रन घेण्याच्या नादात रेहमान बाद झाला. यानंतर ४ बॉलमध्ये श्रीलंकेला १२ धावा हव्या होत्या.
अखेरचे षटक सुरु असताना बांगलादेश आणि श्रीलंकेतील खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला. शाकिब अंपायरशी वाद घालू लागला आणि त्याने आपल्या टीमला माघारी बोलावे. यावेळी काही काळासाठी सामना थांबवण्यात आला. दरम्यान प्रशिक्षक खालिद मेहमूद यांनी बॅट्समनना पुन्हा बॅटिंगसाठी पाठवले आणि पुढच्याच बॉलवर महमूदुल्लाहने फोर मारला आणि त्यानंतर दोन रन्स काढले. अखेरच्या दोन बॉलमध्ये बांगलादेशला सहा रन्स हवे होते. यावेळी पाचव्या बॉलवर महमूदुल्लाहने षटकार मारला आणि स्टेडियममध्ये शांतता पसरली. श्रीलंकेचे चाहते शांत झाले.
Bangladesh should get an Oscar for marvelous acting...#SLvBAN pic.twitter.com/mgJEa2hiEw
— R (@iamrahule) March 16, 2018
या विजयानंतर बांगलादेशच्या क्रिकेटर्सनी मैदानावर नागिन डान्स करत विजयाचा जल्लोष साजरा केला.