IND vs WI: पहिल्या वनडेच्या काही तासांआधी टीम इंडियात या घातक खेळाडूची एन्ट्री

उद्यापासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे सामना रंगणार आहे. काही स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयने नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.

Updated: Feb 5, 2022, 10:26 PM IST
IND vs WI: पहिल्या वनडेच्या काही तासांआधी टीम इंडियात या घातक खेळाडूची एन्ट्री title=

IND vs WI : टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारपासून खेळवला जाणार आहे. पण या मालिकेपूर्वीच अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्णधार रोहित शर्मा पुढे मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र, निवड समितीने त्या खेळाडूंच्या जागी काही नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला. दरम्यान, बीसीसीआयने नवा सट्टा खेळत मालिकेपूर्वीच टीम इंडियामध्ये एका घातक खेळाडूचा समावेश केला आहे.

उद्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेआधी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये आणखी एका घातक फलंदाजाची एन्ट्री केली आहे. शाहरुख खान असे या फलंदाजाचे नाव आहे. या मालिकेसाठी बॅकअप म्हणून शाहरुख खानला आधीच संघात स्थान देण्यात आले होते. पण आता या फलंदाजाने संघात प्रवेश केला आहे. शाहरुख हा उत्तम फलंदाज आहे आणि संघातील त्याच्या उपस्थितीमुळे फिनिशरची उणीव सुटणार आहे. लांब षटकार मारण्यासाठी तो जगभर प्रसिद्ध आहे.

शाहरुख खान आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो, मात्र यावेळी पंजाब संघाने त्याला कायम ठेवलेले नाही. शाहरुखने आयपीएल 2021 मध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली. त्याचबरोबर शाहरुख खान गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने थैमान घालत आहे. त्याच्या बॅटची कामगिरी संपूर्ण जगाने पाहिली आहे. शाहरुख खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून खेळताना 39 चेंडूत 79 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 च्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवला. तो हुबेहूब धोनीप्रमाणे फलंदाजीसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत हा खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर फिनिशरची भूमिका बजावू शकतो. जे टीम इंडियासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

शाहरुखशिवाय इशान किशनची वनडे संघात वनडे संघात निवड झाली. हा युवा फलंदाज पहिल्या सामन्यात सलामी करताना दिसणार आहे. खुद्द कर्णधार रोहित शर्माने ही गोष्ट स्पष्ट केली आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वीही, अनुभवी फलंदाज शिखर धवन कोरोना पॉझिटिव्ह आला आणि केएल राहुल वैयक्तिक कारणांमुळे खेळत नाही.