IND VS WI: काही खेळाडू Covid Positive आल्याने अशी असू असते भारताची प्लेईंग इलेव्हन

Ind vs WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे सीरीज 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Updated: Feb 5, 2022, 08:03 PM IST
IND VS WI: काही खेळाडू Covid Positive आल्याने अशी असू असते भारताची प्लेईंग इलेव्हन title=

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यातील वनडे सीरीज 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आधी एकदिवसीय मालिका आणि नंतर टी-20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये उद्या होणार आहे. सामन्याच्या एक दिवस अगोदर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मीडियासमोर येऊन संघाबाबत स्पष्टता दिली. रोहित शर्माने या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याच्यासोबत ओपनिंग करण्याची जबाबदारी इशान किशन (Ishan Kishan) याच्याकडे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

संघात आधी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांचाही समावेश करण्यात आला असला तरी, हे दोघेही कोविड पॉझिटिव्ह आले आहेत, त्यानंतर मयंक अग्रवाललाही संघात ठेवण्यात आले होते, मात्र तो अजूनही क्वारंटाईनमध्ये आहे, त्यामुळे तो पहिला सामना खेळू शकणार नाही.

संघातील सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि इशान किशनचे स्थान निश्चित झाले आहे, तर माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येईल, यात कोणीही शंका नाही. यानंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. यानंतर सूर्यकुमार यादवला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाऊ शकते. मात्र, सामन्यातील परिस्थितीनुसार या दोघांची संख्याही बदलू शकते. दीपक हुडाची संघातील फिनिशरच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे, तो काही षटकेही टाकू शकतो.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, कुलदीप यादवला सध्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही असे दिसते. म्हणजेच वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल हे फिरकीपटू म्हणून खेळताना दिसतील. दीपक हुड्डा यांच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांना संधी मिळू शकते. यानंतर दीपक चहर येऊ शकतो. युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांना 10 आणि 11 व्या क्रमांकावर ठेवले जावू शकते. अशा प्रकारे संघात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू असू शकतात. दीपक हड्डा हा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असू शकतो.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्य कुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.