IPL 2025 मध्ये BCCI मोठे बदल करण्याच्या तयारीत, 2 नियमांमध्ये होणार बदल?

 बीसीसीआय सध्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील एका ओव्हरमध्ये दोन बाउंसर आणि इम्पॅक्ट प्लेअर या दोन नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत. 

Updated: Aug 31, 2024, 05:53 PM IST
IPL 2025 मध्ये BCCI मोठे बदल करण्याच्या तयारीत, 2 नियमांमध्ये होणार बदल?  title=
(Photo Credit : Social Media)

BCCI Can Change Rules : इंडियन प्रीमियर 2025 सुरु होण्यासाठी आता काहीच महिने शिल्लक आहेत. लवकरच बीसीसीआय आयपीएल 2025 साठी रिटेंशन संदर्भात नियम जाहीर करतील. आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. बीसीसीआय सध्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील एका ओव्हरमध्ये दोन बाउंसर आणि इम्पॅक्ट प्लेअर या दोन नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत. 

बीसीसीआय सध्या या निर्णयावर पोहोचले नाहीत की देशांतर्गत टी 20 आणि आयपीएलमध्ये एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर टाकण्याचा नियम कायम ठेवायचा की नाही. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार हा नियम खास करून टी20 इंटर-स्टेट कॉम्पिटिशन, सैयद  मुश्ताक अली ट्रॉफीसाठी आहे. मागच्या सीजनमध्ये दोन बाउंसरचा नियम हा देशांतर्गत क्रिकेट आणि त्यानंतर आयपीएलमध्ये लागू करण्यात आला होता. ज्यानुसार गोलंदाजांना एका ओव्हरमध्ये दोनदा बाउंसर टाकण्याची परवानगी असते. 

हेही वाचा : राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एंट्री, ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजमध्ये मिळाली संधी

 

आयसीसीपेक्षा वेगळे आहेत बीसीसीआयचे नियम : 

एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर टाकणे हे आयसीसीच्या नियमां विरुद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज ओव्हरमध्ये केवळ एक बाउंसर टाकू शकतो. तेव्हा आता हाच नियम देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेत लागू करण्याचा निर्णय बीसीसीआय घेत आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआय देशांतर्गत आणि आयपीएलसाथीचे नियम लवकर जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. 

जहीर खानने केलं इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाचं समर्थन : 

आयपीएल 2023 मध्ये बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअरचा नवीन नियम आणला होता. काहीजण या नियमाचं समर्थन करत आहेत तर काही या नियमाच्या विरुद्ध आहेत. भारताचा माजी क्रिकेटर गोलंदाज जहीर खानने इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाचं समर्थन केलंय. त्याने म्हंटले की, "इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे निश्चितच खूप अनकॅप भारतीय खेळाडूंना संधी मिळू शकते". जहीरने पुढे म्हंटले की, "जिथे ऑलराउंडरचा संबंध आहे. तर इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे अर्ध्या ऑलराउंडरसाठी कोणतीही जागा नाही. पण जर तुम्ही एक खरे ऑलराउंडर असाल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही". बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते की आयपीएलमधील काही नियमांबाबत शेवटचा निर्णय घेतला जाईल".