IPL 2022 Final: फायनल सामन्याआधी BCCI 'गिनीज बुक'मध्ये नोंदवले नाव

IPL 2022 च्या अंतिम सामन्यात आज बीसीसीआयने नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.

Updated: May 29, 2022, 09:24 PM IST
IPL 2022 Final: फायनल सामन्याआधी BCCI 'गिनीज बुक'मध्ये नोंदवले नाव title=

IPL 2022 Final World Record for largest jersey : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2022 च्या अंतिम सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अंतिम सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी बीसीसीआयने ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव नोंदवले आहे. 

मॅचच्या आधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक महाकाय जर्सी लाँच करण्यात आली. या जर्सीला गिनीज बुकने जगातील सर्वात मोठी जर्सी म्हटले आहे. या पांढऱ्या जर्सीवर 10 संघांच्या लोगोसोबत IPLचा 15 वर्षांचा प्रवासही प्रदर्शित करण्यात आला आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव

बीसीसीआयने सर्वात मोठी जर्सी बनवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. समारोप समारंभात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल उपस्थित होते. जर्सीवर 15 नंबर आहे, जो स्पर्धेच्या 15 व्या आवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये स्पर्धेत सहभागी 10 संघांचे लोगो उत्कृष्ट पद्धतीने सजवण्यात आले आहेत.

फायनल सामना

आज गुजरात आणि राजस्थान यांच्यात शेवटचा सामना रंगत आहे. यासाठी दोन्ही टीमचे खेळाडू खालील प्रमाणे आहे.

गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रनंदेश कृष्णा, ओबेद मॅककॉय आणि युझवेंद्र चहल.