close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इंग्लंडमध्ये भारताचं पानीपत, तरी खेळाडू झाले कोट्यधीश

बीसीसीआयनं भारतीय खेळाडू आणि रवी शास्त्री यांचं मानधन जाहीर केलंय. 

Updated: Sep 10, 2018, 08:24 PM IST
इंग्लंडमध्ये भारताचं पानीपत, तरी खेळाडू झाले कोट्यधीश

मुंबई : बीसीसीआयनं भारतीय खेळाडू आणि रवी शास्त्री यांचं मानधन जाहीर केलंय. शास्त्री यांना बीससीआयनं तब्बल २.५ कोटी रुपये आगाऊ मानधन दिलंय. शास्त्रींचं हे मानधन तीन महिन्यांसाठीच आहे. एकीकडे टीम इंडियाचं इंग्लंडमध्ये पानीपत झालंय. मात्र, बीसीसीआयनं शास्त्रींना पैशाचा धनी केलाय. त्यांना एका वर्षासाठी जवळपास आठ कोटी रुपये बीसीसीआय मानधन देतं. २०१९ विश्वचषकापर्यंत ते भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. क्रिकेट जगतामध्ये कुठल्याही प्रशिक्षकाला एवढ मानधन मिळत नाही.

भारताचा कर्णधार विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे १,२५,०४,९६४ रुपये देण्यात आले. बीसीसीआयनं ही खेळाडू आणि प्रशिक्षकांना देण्यात आलेल्या मानधनाची रक्कम जाहीर केली आहे. याचबरोबर आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे आयसीसीनं दिलेल्या बक्षिसाच्या रकमेचा हिस्साही खेळाडूंना देण्यात आलाय.

विराट कोहली

६५,०६, ८०८ रुपये- दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजसाठी

३०,७०,४५६ रुपये- दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे सीरिजसाठी

२९,२७,७०० रुपये- आयसीसीच्या बक्षिसाच्या रकमेचा हिस्सा

रवी शास्त्री

२,०५,०२,१९८ रुपये आगाऊ मानधन १८-७-२०१८ ते १७-१०-२०१८ पर्यंत

हार्दिक पांड्या

५०,५९,७२६ रुपये जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

६०,७५,००० ऑक्टोबर ते जानेवारी २०१७- करारबद्ध असल्यामुळे

चेतेश्वर पुजारा

२९,२७,७०० रुपये आयसीसीच्या बक्षिसाच्या रकमेचा हिस्सा

६०,८०,७२५ रुपये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजचे

९२,३७, ३२९ रुपये ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

१,०१,२५,००० जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत - करारबद्ध असल्यामुळे

ईशांत शर्मा

५५,४२,३९७ रुपये जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

२९,२७,७०० रुपये आयसीसच्या बक्षिसाच्या रकमेचा हिस्सा

४८,४४,६४४ रुपये दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या टेस्ट सीरिजसाठी

जसप्रीत बुमराह

१,१३,४८,५७३ रुपये जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत - करारबद्ध असल्यामुळे

६०,७५,००० रुपये ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

कुलदीप यादव

२५,०५,४५२ रुपये दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे दौऱ्यासाठी

पार्थिव पटेल

४३,९२,६४१ रुपये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजसाठी

दिनेश कार्तिक

५३,४२,६७२ रुपये जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

६०,७५,००० रुपये ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत- - करारबद्ध असल्यामुळे

भुवनेश्वर कुमार

५६,८३,८४८ रुपये दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजसाठी

२७,१४,०५६ रुपये दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे सीरिजसाठी

१,१८,०६,०२७ रुपये जानेवारी ते मार्च २०१८-- करारबद्ध असल्यामुळे

२९,२७,७०० रुपये- आयसीसच्या बक्षिसाच्या रकमेचा हिस्सा

१,४१,७५,००० रुपये- ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७- करारबद्ध असल्यामुळे

आर. अश्विन

५२,७०,७२५ रुपये- दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजसाठी

९२,३७,३२९ रुपये- जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

२९,२७,७०० रुपये- आयसीसच्या बक्षिसाच्या रकमेचा हिस्सा

१,०१,२५,००० रुपये- ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

रोहित शर्मा

५६,९६,८०८ रुपये- दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजसाठी

३०,७०,४५५ रुपये- दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे सीरिजसाठी

२५,१३,४४२ रुपये- भारत श्रीलंका दौरा निधास कप

२९,२७,७०० रुपये- आयसीसच्या बक्षिसाच्या रकमेचा हिस्सा

युझवेंद्र चहल

२५,०५,४५२ रुपये- दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वनडे सीरिजसाठी

५३,४२,६७२ रुपये- जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

६०,७५,००० रुपये- ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

ऋद्धीमान सहा

४४,३४,८०५ रुपये- दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट सीरिजसाठी

शिखर धवन

१,१२,२३,४९३ रुपये- जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे

२७,००,००० रुपये- श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे

१,४१,७५,००० रुपये- ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत- करारबद्ध असल्यामुळे