मुंबई: टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) देण्यात येणाऱ्या मानधनाचा आकडा उघड झाला आहे. हा आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. बीसीसीआयने रवी शास्त्रींनी तीन महिन्यांचे २.५ कोटी इतके आगाऊ मानधन दिले आहे. शास्त्री यांना बीसीसीआय वर्षाला आठ कोटी इतके मानधन देते.
मात्र, भारतीय संघाच्या इंग्लंडमधील कामगिरीवरून या मानधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जगात कोणत्याही क्रीडा प्रशिक्षकाला इतके मानधन मिळत नाही. २०१९ विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत.