विराट कोहलीपेक्षा स्टायलिश हा खेळाडू

स्टायलिश क्रिकेटर्समध्ये गणला जाणारा टीम इंडियातील स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आज त्याच्या २४वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात हार्दिकने महत्वाची भूमिका बजावली आहे.

Updated: Oct 11, 2017, 01:55 PM IST
विराट कोहलीपेक्षा स्टायलिश हा खेळाडू title=

मुंबई : स्टायलिश क्रिकेटर्समध्ये गणला जाणारा टीम इंडियातील स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आज त्याच्या २४वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात हार्दिकने महत्वाची भूमिका बजावली आहे.

दमदार फटकेबाजी आणि तितकीच चांगली बॉलिंग करत त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले आहे. हार्दिक पांड्याचा जन्म सूरतच्या चोरयासीमध्ये ११ ऑक्टोबर १९९३ ला झाला होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थीती बेताचीच होती. २०१५ मध्ये टीममध्ये निवड झाल्याने आता तो चांगली लाईफस्टाईल जगतो आहे.

 

Blue skies, Blue pool, team Blue and the new hair do 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिक पांड्या आणि त्याचा मोठा कृणाल पांड्या क्रिकेटसाठी परिवारासोबत सूरतहून बडोद्याला शिफ्ट झाले होते. दोन्ही भावांनी माजी खेळाडू आणि कोच किरण मोरे यांच्यांकडून ट्रेनिंग घेतलं आहे. 

 

We cannot solve a problem with the same mind that created it. Have a nice day all

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

खेळासोबत हार्दिक ‘मिस्ट्री गर्ल’सोबतच्या फोटोमुळेही चर्चेत राहिला आहे. बॉलिवूड अभिनेत्रीसोबत ट्विटर चॅट केल्यानेही तो चर्चेत होता. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि हार्दिक पांड्यात यांच्यात ट्विटरवर काही दिवसांपूर्वी बातचीत झाली होती. त्यामुळे अनेकांना या दोघांत काहीतरी शिजतंय असं वाटलं होतं. पण नंतर दोघांनीही तसं काही नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 

 

Wandering about in the live streets of Birmingham! 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

त्यासोबतच हार्दिक पांड्याने गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतरही चाहत्यांमध्ये ही मुलगी कोण? असा संभ्रम निर्माण झाला होता. पण हार्दिक पांड्याने खुलासा करत ती त्याची बहिण असल्याचे सांगितले होते. 

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये हार्दिक पांड्याने दमदार प्रदर्शन केलं होतं. त्याला या सीरिजमध्ये प्लेअर ऑफ द सीरिजने सन्मानित करण्यात आले होते. त्याने ५ सामन्यांमध्ये २२२ रन्स आणि ६ विकेट घेतल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे आज अमिताभ बच्चन यांचाही वाढदिवस आहे. हार्दिक अमिताभ बच्चन यांना मोठा फॅनही आहे. त्यामुळे त्याचा आनंदही त्याला जास्त आहे.