Javed miandad on Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान (India Vs pakistan) यांच्यातील पारंपारिक कटुता गेल्या 15 वर्षात शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या (ICC) इवेंन्टमध्ये भिडल्याचं दिसून येतं. या व्यतिरिक्त दोन्ही संघात द्विपक्षीय सामने खेळवले जात नाहीत. अशातच आता वाद पेटलाय तो आशिया कपच्या आयोजनावरून. भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup 2023) खेळणार नाही, असं बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केल्याने आता पीसीबीने (PCB) देखील नाक मुरडण्यास सुरूवात केली आहे. अशातच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद (Javed miandad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी बीसीसीआयवर घणाघाती टीका केलीये.
सर्व गोष्टी माझ्या हातात असत्या तर मी भारतात जाण्यास नकार दिला असता. आम्ही याआधी देखील भारतात खेळून आलोय. आता भारताची पाकिस्तानात (Ind vs Pak) येण्याची पाळी आहे. जोपर्यंत भारत आमच्याकडं येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानच्या संघाने देखील भारतात खेळण्यासाठी जाऊ नये असं मला वाटतं. पूर्वी दोन्ही संघ एकमेकांच्या देशात जायचे, पण भारतीय क्रिकेट बोर्ड चुकीच्या पद्धतीनं वागतंय, अशी टीका मियाँदाद (Javed miandad) यांनी केली आहे.
विशेषत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सगळं उद्ध्वस्त केलंय. त्यांना देशही उद्ध्वस्त करायचाय, असं ते म्हणाले आहेत. आपण शेजारी बदलू शकत नाही किंवा त्यांना संपवूही शकत नाही. अशी वेळ येईल जेव्हा त्यांचीच माणसे मोदींना मारतील. पंतप्रधान मोदी जे करतायेत ते दोन्ही देशांसाठी घातक असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. त्यावेळी त्यांनी ताटक भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
پاکستان کو ورلڈ کپ کیلئے بھارت نہیں جانا چاہیئے... مودی نے کرکٹ کیساتھ بھارت کو بھی تباہ کردیا ہے، جاوید میانداد#Pakistan #India #AsiaCup2023 #Cricket pic.twitter.com/kpmSJkEsqs
— Ali Hasan (@AaliHasan10) June 18, 2023
खेळ ही दोन देशांना जोडणारी गोष्ट आहे. खेळाच्या माध्यमातून लोक जवळं येतात आणि नातं निर्माण होतं. त्यामुळेच भारत पाकिस्तानमध्ये येऊन आमच्यासोबत खेळत नाही, तोपर्यंत आम्हाला भारतात जाऊन खेळण्याची गरज नाही. भारतापेक्षा पाकिस्तानी क्रिकेट वरचढ आहे. आम्हाला तुमची फिकीर नाही. नरकात जा, आम्हाला काही फरक पडत नाही, असं म्हणत जावेद मियाँदाद यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, एकेकाळी हातभार लावणारे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आता भारतीय राजकारणावरही बोलू लागले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात जावेद मियाँदाद पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय पायवाट रचणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.