Shocking: 2 वर्षात धडाकेबाज फलंदाजाने क्रिकेटमधून तडकाफडकी घेतली निवृत्ती, नक्की कारण काय?

कारकीर्द जोमात असताना अवघ्या 2 वर्षातच या स्टार फलंदाजाकडून क्रिकेटला रामराम, नक्की कारण काय? कोण आहे तो फलंदाज पाहा 

Updated: Jan 6, 2022, 04:57 PM IST
Shocking: 2 वर्षात धडाकेबाज फलंदाजाने क्रिकेटमधून तडकाफडकी घेतली निवृत्ती, नक्की कारण काय? title=

मुंबई : करियरची चांगली सुरुवात होते तोच क्रिकेटपटूवर संन्यास घेण्याची वेळ आली. अवघ्या 2 वर्षांत स्टार फलंदाजानं क्रिकेटला रामराम ठोकला. देशासाठी क्रिकेट खेळल्यानंतर क्रिकेटपटूने अचानक निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांसह संघालाही मोठा धक्का बसला.

 तल्लख प्रतिभा असूनही कोणताही क्रिकेटपटू इतक्या लवकर आपल्या आनंदाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही, पण या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. श्रीलंकेचा स्टार फलंदाज भानुका राजपक्षे याने तत्काळ क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या क्रिकेटपटूने 2019 मध्ये श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 

2 वर्षातच या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भानुकाने श्रीलंकेसाठी 5 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामन्यांमध्ये एकूण 409 आंतरराष्ट्रीय धावा केल्या. तो T20 विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचा भाग होता आणि त्याने एकूण 155 धावा केल्या होत्या.

भानुकाने आपल्या कौटुंबिक जबाबदारीमुळे क्रिकेटला रामराम केल्याचं आपल्या पत्रात म्हटलं आहे. श्रीलंका क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या पत्रात त्याने याचा उल्लेख केला आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. श्रीलंकेच्या बोर्डाच्या निर्णयावर तो खूश नसल्याचा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 

भानुका राजपक्षे 2010 च्या ICC अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. 2019 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या सामन्याने त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. भानुकाने गेल्या वर्षी जुलैमध्ये भारताविरुद्धच्या होम सीरिजमधून वनडेमध्ये पदार्पण केलं होतं. 

फिटनेसच्या चिंतेमुळे वगळल्यानंतर भानुका राजपक्षे यांनी एका मुलाखतीत निवड धोरणांवर टीका केली होती. यानंतर त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषकातून त्याने पुन्हा मैदानात पाऊल ठेवलं होतं.