Mitchell Starc Yashasvi Jaiswal Video: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेअंतर्गत खेळवल्या जात असलेल्या अॅडलेडमधील कसोटीत भारतीय संघ अर्ध्या दिवसाच्या खेळातच 180 धावांवर तंबूत परतला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचा हा निर्णय फारसा योग्य ठरला असं अर्ध्या दिवसाच्या खेळाचा विचार केल्यास म्हणता येणार नाही. यजमानांनी टिच्चू गोलंदाजी करत भारताला फार मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. याचदरम्यान भारतीय फलंदाजांनी गोलंदाजांसमोर नांगी टाकल्याचं दिसून आलं. पर्थमधील कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयसवालला भोपळाही फोडता आला नाही.
झालं असं की, सलामीवीर म्हणून यशस्वी जयसवाल हा के. एल. राहुलबरोबर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. मागील कसोटीमध्ये शतक झळकावणाऱ्या यशस्वीकडून या सामन्यातही दमदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र सामन्यातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयसवाल बाद झाला. विशेष म्हणजे त्याला मिचेल स्टार्कने बाद केलं. स्टार्कटने टाकलेला पहिलाच चेंडू यशस्वीला समजलाच नाही आणि तो पायचित झाला. पहिल्याच चेंडू यशस्वीच्या पायला लागल्यानंतर स्कार्कसहीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपिल केलं असता यशस्वीला बाद घोषित करण्यात आलं. त्यानंतर के. एल. राहुलबरोबर यशस्वीने डीआरएस रिव्ह्यू घ्यावा की नाही याबद्दल चर्चा केली. पण के. एल. राहुलने रिव्ह्यू न घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर यशस्वी कोणताही आक्षेप न घेता मैदानाबाहेर निघून गेला.
यशस्वी जयसवाल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने मागील कसोटीमध्ये त्याने स्टार्कला डिवचल्याची आठवण झाली. मागील सामन्यामध्ये स्टार्कला डिवचताना यशस्वीने, 'तुझे चेंडू तितक्या वेगाने येत नाहीत,' असं म्हटलं होतं. आता पहिल्याच बॉलवर स्टार्कने त्याला बाद केल्यानंतर अनेकांना मागील कसोटीतील हा टोमणा आठवला असून चाहत्यांनी यशस्वीला स्टार्क महान गोलंदाज असल्याची आठवण करुन दिली आहे. अनेकांनी यशस्वी बाद झाल्यानंतर, आता बॉल एवढा फास्ट आला की यशस्वीला दिसलाच नाही असा टोलाही लगावला आहे.
Mitchell Starc sends Adelaide into delirium.#AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/pIPwqlX3dJ
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2024
"बॉल फार स्लो येतोय... मला अपेक्षा आहे की जयसवाल आज काहीतरी शिकला असेल. त्या दिवशी ज्या पद्धतीने तू एका मोठ्या खेळाडूचा अपमान केला तसं नव्हतं करायला पाहिजे. तुला दिवस चांगला गेला असेल तर तू विनम्र राहिलं पाहिजे. कारण त्या दिवशी तू जे काही केलं त्यामुळेच तुझ्याबरोबर आज हे झालं. मला त्या दिवशी स्टार्कबद्दल वाईट वाटलं होतं," असं एकाने स्टार्कला हिणवताना म्हटलं आहे.
Ball is coming too slow!
Jaiswal, I hope you learn something today. You don't humiliate the legend the way you did that day, if you are having good day then stay humble coz what you did that day coming to haunt you today.
That day, I felt bad for Starc.pic.twitter.com/QOQeoPKYRa
— Rajiv (@Rajiv1841) December 6, 2024
स्टार्कने 14.1 ओव्हरपैकी 2 निर्धावर ओव्हर टाकल्या. त्याने 48 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या.