नवी दिल्ली : श्रीलंकामध्ये खेळण्यात आलेल्या ट्राय सिरीज फायनल अत्यंत रोमांचक झाली आणि अनेक काळ ही अनेकांच्या स्मरणात राहणारी आहे. या सामन्यात असे काही घडले त्यावरून सिद्ध होते की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या सामन्यात भारत पराभूत होता होता जिंकला आणि बांग्लादेश जिंकता जिंकता पराभूत झाले. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला असता तर सामन्याचा व्हिलन विजय शंकर झाला असता पण या शंकराला कार्तिकने वाचविले.
विजय शंकरला त्याच्या आंतराराष्ट्रीय करिअरमध्ये पहिल्यांदा फलंदाजीला पाठविले तेही अशा स्थितीत जेव्हा खूप प्रेशर होते. अशा स्थिती मोठ मोठ्या फलंदाजांना घामटा फुटतो. पण नवख्या विजयला फलंदाजीला पाठविले. इथेच रोहितचे चुकले. रोहित बाद झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक यायला हवा होता. पण त्यांनी विजय शंकरला पाठविले. विजयने हे लक्ष्य अजून कठीण बनवले. त्याने एक ओव्हरमधील चार चेंडू निर्धाव खेळले. त्यामुळे दुसऱ्या बाजूला प्रेशर आले आणि मनीष पांडे बाद झाला.
भारतीय टीम अशा स्थितीला पोहचली ज्यावेळी १८ चेंडूत ३५ धावा पाहिजे होत्या. १८ षटकात कर्णधार शाकीब अल हसनने आपल्या संघाचा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज मुस्ताफीजूरकडे चेंडू दिला. त्याने चार चेंडू शंकरला खेळू दिले नाही आणि एकही धाव दिली नाही. पाचव्या चेंडूवर लेग बाय म्हणून एक धाव काढली. अंतीमच्या चेंडूवर मनीष पांडे स्ट्राइकवर आला आणि दबावामुळे त्याने आपली विकेट फेकली.
विजयने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात श्रीलंकेत ट्राय सिरीजने केली. आपल्या करिअरममध्ये पहिल्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजीला आला. पण त्याने १९ चेंडूत केवळ १७ धावा केल्या.