T20 World Cup : Semi Final पूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी; रोहित शर्मा संघातून....

T20 World Cup : भारतीय संघाची टी20 वर्ल्ड कपमधील विजयी घोडदौड सुरु असतानाच, क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी 

Updated: Nov 8, 2022, 07:59 AM IST
T20 World Cup : Semi Final पूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी; रोहित शर्मा संघातून....  title=
Breaking news Team india captain rohit sharma gets injured before semi final against england

Rohit Sharma Injured: गुरुवारी (Team india) भारतीय संघाविरोधात खेळल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) उपांत्य सामन्यापूर्वी (Semi Finals) Team India ला धक्का बसला आहे. कारण संघाच्या चिंतेत भर टाकणारी बातमी नुकतीच समोर आलीये. ही बातमी म्हणजे भारतीय संघाची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे, तोच रोहित शर्माच्या (Captain Rohit sharma) दुखापतीची. 

Team India संकटात...?

सूत्रांच्या माहितीनुसार सामन्यापूर्वी सराव सुरु असतानाच रोहित नेट्समध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीकडे (Rohit sharma injured) पाहता, संघावर मोठं दडपण आलं असून तो संघातून बाहेर पडल्यास एक मोठी पोकळी निर्माण होणार याचीच चिंता संघातील अनेकांना भेडसावत होती. त्यामुळं हातात असणाऱ्या वेळेत पूर्णपणे सावरून मैदानात येण्यासाठी खुद्द रोहितसुद्धा प्रयत्नशील असल्याचं दिसला.  

अधिक वाचा : IND vs ENG : T20 World Cup सेमी फायनल जिंकण्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज, भारताची Playing 11 ठरली

 

दुखापतीनंतर लगेचच सोडला सराव... 

रोहितला दुखापत झाल्यानंतर त्यानं लगेचच सराव थांबवण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर टीम इंडियाचा हा कर्णधार तडक ड्रेसिंग रुममध्ये गेला. सध्याच्या घडीला तो या संकटातून सावरावा अशीच प्रार्थना क्रिकेटप्रेमींनी केली. कारण, इंग्लंडविरोधी सामन्यात रोहितचं नसणं भारतीय संघासाठी धोक्याची सूचना ठरु शकते असं वाटत असतानाच तो पुन्हा एकदा रावासाठी मैदानात आला आणि अनेकांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. 

रोहितची T20 वर्ल्ड कपमधील कामगिरी (Rohit sharmas performacne in t20 World Cup 2022)

रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्यास त्याला संघातून अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर काढता पाय घ्यावा लागू शकतो, असाच अंदाज अनेकांनी वर्तवला. पण तूर्तास तशी कोणतीही भीती नसून तो दुखापतीतून सावरत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यानं संयमी खेळी करत संघाला योग्य दिशा दाखवल्याचं कळत आहे. आतापर्यंत T20 World Cup मध्ये त्यानं पाच सामन्यांमध्ये 89 धावा केल्या आहेत. आता इंग्लंडसोबतच्या (Ind vs Eng) सामन्यात तो मैदानात दिसणार का, हे येणारा काळच  ठरवणार आहे.