PAK vs NZ: किवींची विकेट जाता-जाईना! अखेर कर्णधारानेच लढवली शक्कल पण...

Pak vs NZ : पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) पहिल्यांदा फलंदाजी करत 438 रन्स केले आहेत. यानंतर न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) फलंदाजीला उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे. 

Updated: Dec 28, 2022, 10:31 AM IST
PAK vs NZ: किवींची विकेट जाता-जाईना! अखेर कर्णधारानेच लढवली शक्कल पण... title=

Pakistan vs New Zealand 1st Test Karachi : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 2 सामन्यांची टेस्ट सिरीज होणार आहे. यामध्ये पहिला सामना कराचीच्या नॅशनल स्डेडियमवर खेळवला जातोय. ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्यय घेतला. पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) पहिल्यांदा फलंदाजी करत 438 रन्स केले आहेत. यानंतर न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) फलंदाजीला उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे. अखेर विकेट पडत नसल्याचं पाहिल्यानंतर कर्णधार बाबर आझमने स्वतः आपल्या हाती बॉल घेत गोलंदाजी केली आहे. ( Babar Azam Bowling in last over )

न्यूझीलंडकडून टॉम लेथम आणि डिवॉन कॉनवे फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. यावेळी दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवून दिली. या दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दुसऱ्या दिवस संपेपर्यंत न्यूझीलंडने 47 ओव्हरमध्ये एकंह विकेट न गमावता 165 रन्स केलेत. लॅथम 78 रन्सवर त कॉनवे 82 रन्सवर खेळतोय. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची होणारी धुलाई पाहता अखेर बाबरने स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बाबर आझमने केली गोलंदाजी

बाबर आझमने 3.67 च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत 3 ओव्हरमध्ये 11 रन दिले. बाबर आझमला गोलंदाजी करताना फार क्वचितच लोकांनी पाहिलं असेल. दरम्यान बाबर आझमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

पहिल्या सामन्यात बाबरने ठोकलं शतक

न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये बाबर आझमने शतक ठोकलं. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यांमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर पुन्हा एकदा बाबरची बॅट चमकली आहे. आझमने 57.50 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 161 रन्स केले. यावेळी 280 बॉल्सचा सामना केलाय. त्याच्या या खेळीमध्ये 15 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे.

बाबर आझमचा मोठा रेकॉर्ड

पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबरने 13 धावा करताच बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात (Most runs in calendar year) म्हणजेच यंदाच्या वर्षात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. बाबरने ही इनिंग खेळत मोहम्मद युसूफचा (Mohammad Yousuf) विक्रम मोडीत काढला. 2006 मध्ये मोहम्मद युसूफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 2435 धावा करण्यात यशस्वी ठरला होता.