IND vs NED: नेदरलँड्सविरूद्ध 'या' घातक खेळाडूला कर्णधार रोहित देणार संधी; कशी असेल Playing XI

IND vs NED: दिवाळीच्या दिवशी म्हणजे आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड मानलं जातंय. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार हे पाहूया. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 12, 2023, 08:09 AM IST
IND vs NED: नेदरलँड्सविरूद्ध 'या' घातक खेळाडूला कर्णधार रोहित देणार संधी; कशी असेल Playing XI title=

IND vs NED: यंदाचा वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज लीग स्टेजमधील शेवटचा सामना भारत विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने अजून एकंही सामने गमावलेला नाही. अशातच आजचा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. या सामन्यात प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर एक नजर टाकूया. 

दिवाळीच्या दिवशी म्हणजे आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना खेळला जाईल. टीम इंडिया यापूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचली आहे. तर नेदरलँड्स स्पर्धेतून बाहेर पडला असून हा त्यांचा शेवटचा सामना आहे. या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड मानलं जातंय. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार हे पाहूया. 

ओपनिंग जोडीमध्ये नसणार कोणाताही बदल

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच फलंदाजीसाठी चांगलं मानलं जातं. अशातच शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा वर्ल्डकपमध्ये नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात डावाची सुरुवात करू शकतात. रोहित शर्मा आणि शुभमन गिल पहिल्या 10 ओव्हर्समध्ये रन्स करण्यात माहीर आहेत. अशा स्थितीत इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागू शकतं. तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. 

कशी असेल टीम इंडियाची मिडल ऑर्डर

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरलमध्ये फलंदाज श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. यावेळी विकेटकीपर फलंदाज केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तर सूर्यकुमार यादव 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. 

गोलंदाजी डिपार्टमेंटची जबाबदारी कोण सांभाळणार?

नेदरलँड्सविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पिनर कुलदीप यादवची जागा निश्चित आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताची टीम मॅनेजमेंट रविचंद्रन अश्विनला संधी देऊ शकते. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची निवड होणं जवळपास निश्चित आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हेन 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.