टीम इंडियाच्या विजयानंतर कोहलीने साजरा केला आनंद

दक्षिण अफ्रिकेविरूद्ध सुमार ठरलेल्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात जोरदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयावर कर्णधार विराट कोहली भलताच खूश आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 28, 2018, 07:49 PM IST
टीम इंडियाच्या विजयानंतर कोहलीने साजरा केला आनंद title=

नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेविरूद्ध भारताने टेस्ट सीरीज २-१ अशा फरकाने गमावली. पण, सुरूवातीच्या दोन सामन्या अगदीच सुमार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात जोरदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयावर कर्णधार विराट कोहली भलताच खूश आहे. या विजयाचा आनंत त्याने ट्विटर हॅडलवर एक छायाचित्र शेअर करून व्यक्त केला आहे. ज्यात तो सहाऱ्यांसोबत आनंद साजरा करताना दिसत आहे.

प्रंचड आनंदाचा दिवस

हे छायाचित्र ट्विट केल्यावर त्याने त्याखाली लिहीले आहे, संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने कामगिरी केली. त्याबद्धल अभिमान आहे. मला सहकाऱ्यांच्या कामिगिरीचा प्रचंड गर्व आहे. हा दिवस माझ्यासाठी नेहमीच आठवणीत राहिल. जय हिंद.

६३ धावांनी टीम इंडिया विजयी

भारताने वंडर्स स्टेडियममध्ये झालेल्या तीसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला ६३ धावांनी पराभूत केले. पण, हा विजय मिळवला असला तरी या मैदानावरचा भारताचा पराभवाचा इतिहास कायम राहिला आहे. एक सामना जिंकून उरलीसुरली पत काहीशी राखली इतकाच काय तो अपवाद.