ट्विटरवर धोनी आणि चहलवर कौतुकांचा वर्षाव

धोनी आणि चहलच्या शानदार कामगिरीने दिग्गजांकडून कौतुक

Updated: Jan 18, 2019, 04:43 PM IST
ट्विटरवर धोनी आणि चहलवर कौतुकांचा वर्षाव title=

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीमने शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा भारताने वनडे सिरीज जिंकली आहे. याआधी झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये देखील पहिल्यांदा भारतीय टीमने ऑस्ट्रेलियात जावून विजय मिळवला आहे. भारताने आजचा सामना 7 विकेटने जिंकला. महेंद्र सिंह धोनीने या सामन्यामध्ये 87 रन केले. पहिल्यादा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या विराट सेनेने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जास्त रन बनवू दिले नाहीत. ऑस्ट्रेलिया टीम 230 रनवर ऑलआउट झाली.

आजच्या सामन्यानंतर ट्विटरवर धोनी आणि चहलचीच चर्चा आहे. हे दोन्ही खेळाडूंवर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. चहलने शानदार गोलंदाजी करत 6 विकेट घेतले. सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला एकामागे एक झटके लागल्याने जास्त स्कोर करता आला नाही. या सामन्यात धोनीने शानदार खेळी केली.