CSK vs GT : चेन्नईची एक्सप्रेस सुसाट...! ऋतुराजची स्मार्ट कॅप्टन्सी, गुजरातचा 63 धावांनी पराभव

IPL 2024 CSK vs GT: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. सीएसकेने गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला.

सौरभ तळेकर | Updated: Mar 27, 2024, 12:34 PM IST
CSK vs GT : चेन्नईची एक्सप्रेस सुसाट...! ऋतुराजची स्मार्ट कॅप्टन्सी, गुजरातचा 63 धावांनी पराभव title=
Chennai Super Kings beat Gujarat Titans

IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans :  चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात आयपीएलचा 7 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात शिवम दुबेची (Shivam Dube) आक्रमक फलंदाजी अन् ऋतुराजच्या (Ruturaj Gaikwad) स्मार्ट कॅप्टन्सीमुळे चेन्नईने दुसरा विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर आता चेन्नईने पाईंट्स टेबलमध्ये (IPL 2024 Points Table) देखील अव्वल स्थान गाठलं आहे. नियमीत टप्प्यात विकेट्स गेल्याने गुजरातला फलंदाजी करताना वर तोंड काढता आलं नाही. याचाच फायदा घेत चेन्नईने दबावतंत्राचा वापर केला अन् गुजरातला पहिल्या पराभवाची चव चाखवी लागली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 206 धावा केल्या होत्या.

चेन्नईने दिलेल्या 207 धावांचं आव्हान पार करताना सुरूवात चांगली झाली. कॅप्टन शुभमन गिल आणि वृद्धीमान सहा यांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये 28 धावा करत हल्लाबोल केला. मात्र, शुभमन बाद झाल्यावर गुजरातची गाडी स्लो झाली. साई सुदर्शनने 31 बॉलमध्ये 37 धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या साईला चांगली सुरूवात मिळून देखील खास कामगिरी करता आली नाही. टीम अडचणीत असताना डेव्हिड मिलरला संघाला सावरता आलं नाही. तुषार देशपांडेच्या बॉलवर मिलर बाद झाला. अखेर राशीद खान आणि राहुल तेवतिया यांच्यावर गुजरातच्या आशा होत्या. मात्र, प्रेशरचा वापर करून चेन्नईने गुजरातची फलंदाजी दाबली अन् सलग दुसरा विजय खिशात घातला.

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या गुजरातला कॅप्टन शुभमन गिलचा निर्णय भारी पडला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 206 धावा उभ्या केल्या आहेत. चेन्नईकडून शिवम दुबे याने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला 200 पार पोहोचवलं. शिवमने 5 सिक्स अन् 2 फोरच्या मदतीने 23 बॉलमध्ये 51 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रचिन रविंद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी प्रत्येकी 46 धावांची खेळी केली. अखेरीस चेन्नईचा समीर रिझवी चमकला. दोन  खणखणीत सिक्स मारत समीरने 6 बॉलमध्ये 14 धावा कुटल्या. तर गुजरातकडून राशिद खानने 4 ओव्हरमध्ये 49 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.           

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, शुभमन गिल (C), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.