नवी दिल्ली : कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये भारत आणि श्रीलंका हा पहिला टेस्ट सामना अनेक रेकॉर्डचा साक्षीदार ठरला.
यामध्ये अनेक रेकॉर्ड बनवण्यात आले. यात अव्वल ठरला टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा रेकॉर्ड सचिन आणि गावस्करला देखील आपल्या नावावर नोंदवता आला नाही तो रेकॉर्ड चेतेश्वर पुजाराने केला आहे. चेतेश्वर पुजारा या टेस्ट सामन्यात असा खेळाडू ठरला ज्याने पाचही दिवस फलंदाज करून एक अनोखा विक्रम रचला. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण ही सामना लक्षपूर्वक पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल.
भारतीय क्रिकेटमध्ये ५१६ टेस्ट सामन्यात फक्त दोन वेळा असं झालं आहे. यामध्ये पहिली व्यक्ती आहे एमएल जयसिम्हा आणि दुसरी व्यक्ती आहे टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री. आणि महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही सामने कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये झालेले आहेत. आता यावर तिसरा फलंदाज म्हणून चेतेश्वर पुजाराने आपलं नावं नोंदवलं आहे.
ईडनमध्ये पाचव्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी उतरलेला पुजारी २२ धावा घेऊन तंबूत परतला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेथे पुजारा २ धावांसोबत नाबाद राहिला.
कोलकाताच्या या टेस्टमध्ये पहिल्या दिवशी जास्त खेळ झाला नाही. मात्र एकामागून एक विकेट गेल्यामुळे पुजाराला मैदानावर उतरावे लागले. पहिल्या दिवशी पुजारा ८ धावा करून नाबाद राहिला. दुसऱ्या दिवशी पाऊस पडल्यामुळे सामना बंद पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सामना थांबला तेव्हा पुजारा ४७ धावांवर नाबाद होता. तिसऱ्या दिवशी ५२ धावा करून आऊट झाला पुजारा.
सामन्याच्या चौथ्या दिवशी शिखर धवन आऊट झाल्यानंतर शेवटच्या क्षणी पुजाराला फलंदाजी मिळाली. पुजारा २ धावा करून नाबाद राहिला. आणि सोमवारी पाचव्या दिवशी कोणतीही गडबड न करता पुजारा पाचव्या दिवशी देखील मैदानावर उतरला आणि नवा रेकॉर्ड केला.