T20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, 'हे' 2 संघ फायनल खेळणार!

T20 World Cup चे दोन फायनलिस्ट कोण? Chris Gayle म्हणतो...

Updated: Oct 10, 2022, 10:45 PM IST
T20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, 'हे' 2 संघ फायनल खेळणार! title=

Chris Gayle : आगामी T20 World Cup 2022 ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील, त्यापैकी 8 आधीच सुपर 12 टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे इतर चार संघ त्यांच्याशी सामील होतील. भारतीय संघ सुपर 8 मध्ये आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार मानला जात असतानाच आता वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने (Chris Gayle) मोठं वक्तव्य केलंय.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका सुपर 12 साठी पात्र ठरले आहेत. सुपर 12 टप्प्यातील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ नंतर बाद फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे T20 World Cup 2022 आणखी मजेदार होणार असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार कोण?, यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे 13 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील फायनल  (T20 World Cup 2022 Final) खेळली जाईल, असं भाकित जागतिक क्रिकेटचा युनिव्हर्सल बॉस (Universal boss) ख्रिस गेलने वर्तवलं. गेलच्या या वक्तव्यानंतर आता क्रिडाविश्वास एकच चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा - IND vs SA: वर्ल्ड कप संघात दावेदारी ठोकणारा 'हा' युवा खेळाडू टीम इंडियातून 'आऊट'

आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या अनुपस्थितीमुळे वेस्ट इंडिजच्या (West Indies) युवा संघाला नक्कीच फटका बसेल, असं आत्तापर्यंतच्या सर्व T20 विश्वचषकांमध्ये खेळलेल्या गेलला वाटतं. तरी देखील ख्रिस गेलला विश्वास वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर विश्वास आहे. सध्याचे खेळाडू प्रतिभावान आहेत आणि ते कोणत्याही संघासाठी धोकादायक ठरू शकतात, असंही युनिव्हर्सल बॉस म्हणाला.