मुंबई : ख्रिस गेलने हैदराबाद विरुद्ध सीजनमधलं पहिलं आणि टी20 मधलं 21 वं शतक ठोकलं. हे शतक ठोकत गेलने आपल्या विरोधकांना चांगलंच उत्तर दिलं आहे. गेलने शतक ठोकल्यानंतर बोलतांना अनेक गोष्टींचा खुलासा केला. नेहमी सिक्स, फोर मारणारा गेल या सामन्यात 1, 2 रन काढतांना देखील दिसत होता. गेलने यामागचं गुपीत उघड केलं आहे.
गेलने सामन्यानंतर बोलतांना म्हटलं की, मी टीमसाठी समर्पित आहे. पंजाब सोबत जोडले गेल्यानंतर सेहवाग मला योगा शिकवणाऱे आणि मसाज करणाऱ्यांसोबत राहायला सांगत आहे. मी माझं गुपीत आहे. मला वाटतं मी एका आठवड्यात पायाच्या पंजांना स्पर्श करु शकतो.'
गेलने हैदराबाद विरुद्ध 11 व्या सीजनमधलं पहिलं शतक ठोकलं. गेलने लीगमधलं सहावं तर टी20 क्रिकेटमधलं 21 वं शतक पूर्ण केलं आहे. लीगमधील अनेक रेकॉर्ड गेलच्या नावावर आहे. गेलला सुरुवातीला कोणीच खरेदी केलं नव्हतं. पण शेवटी पंजाबने बेस प्राईस 2 कोटींना गेलला खरेदी केलं. याची खंत देखील गेलने शेवटी बोलून दाखवली.
लिलावात सुरुवातीला गेलला कोणीच विकत घेतलं नव्हतं. त्यावर बोलताना गेलने म्हटलं की, 'मला वाटतं की, सेहवागने माझी निवड करत लीगमध्ये रोमांच कायम ठेवला. ही चांगली सुरुवात आहे. सेहवागने एका इंटरव्यूमध्ये म्हटलं होतं की, मी जर त्यांना 2 सामने जरी जिंकवलं तरी पैसे वसूल होऊन जातील.'