मुंबई: वेस्ट इंडिजचा धुरंधर फलंदाज आणि युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलवर तरुणीनं गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल सध्या लग्झरी आयुष्य जगत आहे. तो सर्व टी 20 लीग खेळतो. बर्याचदा ख्रिस गेल वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असते.
ख्रिस गेल आणि वादविवाद हे समीकरण तसं जुनंच आहे. 2015 च्या वर्ल्ड कप दरम्यान ख्रिस गेलवर गंभीर आरोप झाले होते. मालिश करणाऱ्या तरुणीने गेलवर गंभीर आरोप लावला होता. या महिलेनं केलेल्या दाव्यानुसार गेलनं तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं.
मालिक करणाऱ्या तरुणीच्या दाव्यानुसार ख्रिस गेलनं आपला टॉवेल उघडून तरुणीसोबत गैरप्रकार केला होता. त्यानंतर तरुणी खूप रडली होती. या दाव्यानंतर ख्रिस गेल वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
झी 24 तासने मात्र या वृत्ताला कोणताही दुजोरा दर्शवलेला नाही. फेयरफॅक्स मीडिया न्यूजपेपर्स, द सिडनी मॉर्निंग हेराल्ड, द एज आणि द कॅनबरा टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलं होतं. या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ख्रिस गेलनं तरुणीसोबत गैरवर्तन केलं. महिला मसाज थेरेपिस्ट मरायुसे लीने रसेलच्या समोर मालीश दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. गेलने जाणीवपूर्वक त्याच्या अंगावरचा टॉवेल काढल्याचा आरोप या महिनेनं केला आहे.
या घटनेनंतर मी खूप रडले असंही पुढे या तरुणीनं सांगितलं आहे. या प्रकरणी सुनावणी दरम्यान थेअरपीस्टने सांगितलं की मी रूममध्ये काहीतरी शोधत होते. तेव्हा मला गेल ने विचारलं काय शोधत आहेस? मी टॉवेल असं उत्तर दिल्यानंतर त्याने आपला कमरेचा टॉवेल काढला. मला नको ते दिसलं मी त्यावर गेलची माफी मागितली मात्र त्याने हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप महिला थेअरपिस्टने केला.